जुन्या 100 रूपयांच्या नोटा चलनातून होणार बाद ? जाणून घ्या RBI नं काय सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या वापरात असणाऱ्या ५, १० आणि १०० रुपयांच्या सर्व नोटा मार्च अथवा एप्रिलपर्यंत बाजारातून काढून घेण्याचा विचार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असल्याची माहिती RBI चे असिस्टंट जनरल मॅनेजर बी महेश यांनी दिली. ते जिल्हास्तरीय बँकांनी आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत बोलत होते.

बी महेश म्हणाले, १० रुपयांचे नाणे आणून १५ वर्षे झाले तरीही व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही. अद्यापही अनेकांच्या मनात १० रुपयाच्या नाण्याबाबत शंका आहे. त्यामुळे नवीन नाणे रिझर्व्ह बँकेसाठी अडचणीचे ठरले. लोकांमध्ये संभ्रम दूर करण्यासाठी बँकेकडून काही प्रयत्न केले जावेत, तसेच लोकांनी १० रुपयांच्या नाण्याचा वापर करावा यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितलं.

२०१९ मध्ये रिझर्व्ह बँकेने ‘राणी की वाव’ दाखवणाऱ्या नव्या डिझाईनमधील १०० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. असे असले तरी सुद्धा जुन्या नोटा चलनात तशाच सुरु राहणार आहे. नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने २०० रुपयांची नोटही चलनात आणली. परंतु, सध्या चलनात असलेल्या ५, १० आणि १०० रुपयांच्या सर्व नोटा मार्च किंवा एप्रिलपर्यंत बाजारातून काढून घेण्याचा विचार RBI करत असल्याचे महेश यांनी म्हटले.

२०० रुपयांच्या नोटा चलनात दिसत नसल्याची प्रश्नावर स्पष्टीकरण देताना महेश म्हणाले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जास्त किंमत असलेल्या नोटांची छपाई तात्पुरती थांबवली आहे. त्यामुळे सध्या बाजारात २००० रुपयांच्या नोटा जास्त दिसत नाही. नोटबंदी केल्यावर बाजारात कमी वेळात लोकांना जास्त पैसे मिळावेत म्हणून सुरुवातीस २ हजार रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात छापल्या गेल्या.