Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान बंद होऊ शकतात अनेक बॅंकांच्या शाखा, कॅश विड्रॉलसाठी नव्या व्यवस्थेवर विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय रिझर्व्ह बँक आणि प्रमुख सरकारी बँक आतापर्यंत यावर विचार करत आहे की लॉकडाऊनच्या या स्थितीत आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी अधिकाधिक बँकांच्या शाखा कशा बंद ठेवता येतील. काही वृत्तानुसार 1.3 अरब लोकसंख्या असलेल्या भारतात अधिक लोक असे आहेत जे रोख रक्कमेवरच आपला रोजचा दिनक्रम भागवतात.

लॉकडाऊनच्या स्थितीत सुरु आहेत बँका –

हेच कारण आहे की 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या निर्णयात बँकांना सूट देण्यात आली होती. बँक सेवा अत्यावश्यक सांगून त्या सुरु ठेवण्यास सांगण्यात आल्या होत्या, परंतु सरकारने गैर आवश्यक सेवा म्हणून अस्थायी स्वरुपात बँका बंद करुन कर्मचाऱ्यांची संख्या की करण्यास सांगितले होते.

काय आहे योजना-

शक्यता आहे की प्रति 5 किलोमीटरनंतर फक्त 1 च बँक शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सूत्रांच्या मते हा निर्णय प्रमुख शहरांसाठी असेल परंतु अद्याप याबाबत माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

ग्रामीण भागात बँक शाखा 1 दिवसाआड उघडल्या जातील, जेथे स्टाफ वेलफेअर स्कीम्स अंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेला काढण्यास लोकांना मदत मिळेल. जवळपास 70 टक्के लोक गावात राहतात आणि ते पूर्णता रोख रक्कमेवर आपला दिनक्रम भागवतात.

ग्रामीण भागांना प्राथिकता –

एका सरकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, साधारण कल्पना ही आहे की ग्रामीण भागात बँक शाखा सुरु राहतील जेणे करुन जे लोक डिजिटल व्यवहार करण्यास सक्षम नाहीत त्यांना समस्या येणार नाही.
सर्व बँका या प्रकरणावर एकमेकांशी चर्चा करत आहे, आता सरकारने बँक ट्रांफसरच्या माध्यमातून दिलासा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या क्षेत्रात बँक विड्रॉलमध्ये फायदा होऊ शकतो.

सरकारने केली पॅकेजची घोषणा –

देशात लॉकडाऊननंतर 36 तासानंतर 1.7 लाख कोटी रुपये आर्थिक दिलासा देणारे पॅकेज करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आर्थिक स्थिती बेताची असलेल्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतील.

काही बँका पहिल्यापासून यावर काम करत होत्या, परंतु हे अद्याप स्पष्ट झाले नाही की हे पूर्णता लागू केले जाईल अथवा नाही. अद्यापही आरबीआय आणि इंडियन बँक असोसिएशनने याबाबतची माहिती दिलेली नाही.

इंटर ऑपरेबेल सर्विसेसवर विचार –

सूत्रांच्या मते, मागील 1 आठवड्यापासून या योजनेवर विचार सुरु आहे. बँकांमध्ये यावर विचार सुरु आहे की या दरम्यान इंटर ऑपरेबेल सर्विसेज कशा सुरु केल्या जातील. म्हणजे एखाद्या बँकेचा ग्राहक दुसऱ्या बँकेत जाऊन रोख पैसे काढू शकतो, या व्यवहारांचे दोन बँकांदरम्यान सेटलमेंट केली जाईल.