बुधवारी मध्यवर्ती शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार

nagar Water supply : पोलीसनामा ऑनलाइन – मुळानगर, विळद येथे पावसामुळे आज दुपारपासून वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यामुळे बुधवारी (दि.18) शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे मनपाकडून कळविण्यात आले आहे.

आज सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. वीजपुरवठा खंडीत राहिल्याने उपसा बंद होऊन पाणी वितरणाच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत. त्यामुळे शहरात आज रोटेशन असलेल्या झेंडीगेट, धरती चौक, गंजबाजार, आडतेबाजार, कोठी, मंगळवार बाजार, माळीवाडा आदी भागात पाणी सोडले जाणार नाही. या भागात गुरुवारी (दि.19) पाणीपुरवठा केला जाणार आहे. तर गुरुवारी रोटेशन असलेल्या भागात शुक्रवारी (दि.20) पाणी सोडण्यात येणार असल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शहराला पाण्याचा असलेल्या मुळा धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे त्याचा पाणी वितरणावर परिणाम झाला आहे. महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

You might also like