Lockdown, नाईट कर्फ्यूवरून केंद्राकडून राज्याला पत्र

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. हा एक चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधक केंद्रीय समितीने केलेल्या महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. त्यामध्ये कोरोना प्रतिबंध नियम फारसे प्रभावी ठरताना दिसत नाही, असे पत्र लिहिले आहे.

केंद्रीय पथकाने पाहणीनंतर लिहिलेल्या पत्रात म्हटले, की महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक पुन्हा होताना दिसत आहे. पण कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेले नियम फारसे प्रभावी ठरत नाहीत, असे दिसत आहे. राज्यात लावण्यात आलेला नाईट कर्फ्यू, लॉकडाउनचाही प्रभावी असा फरक पडत नाही. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णाच्या घराची तातडीने माहिती मिळवणे, कंटेन्मेंट झोनवर जास्त लक्ष ठेवणे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे यांसारख्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि झोपडपट्टी यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचण्या वेगाने केल्या जाव्या. अँटिजेन रॅपिड टेस्ट किट्सचा वापर केला जावा, अशा सूचनाही या केंद्रीय पथकाने केल्या आहेत.