ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात पुन्हा होत आहेत बदल ! केंद्राने जारी केले ड्राफ्ट नोटिफिकेशन

नवी दिल्ली : कोरोना काळात परदेशात फसलेल्या भारतीयांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार मोठे पाऊल उचलत आहे. या अंतर्गत परदेशात फसलेल्या त्या भारतीयांना सवलत मिळेल, ज्यांच्या इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स परमिटची वॅलिडिटी संपली आहे. केंद्र त्यांच्यासाठी मोटर व्हेईकल नियम, 1989 मध्ये दुरूस्ती करणार आहे. काही प्रकरणात असे आढळून आले की, परमिटच्या नूतनिकरणाचे कोणतेही मेकॅनिज्म नाही. अशावेळी नियमांमध्ये करण्यात येत असलेल्या दुरूस्तीने परदेशात फसलेल्या भारतीयांना मोठी मदत मिळेल. रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने दुरूस्तीसाठी संबंधित ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केले आहे.

भारतीय दूतावासाच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज
ड्राफ्ट नोटिफिकेशननुसार, भारताचे असे नागरिक ज्यांच्या इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स परमिटची वॅलिडिटी संपली आहे, ते भारतीय दूतावासाच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या अर्जांना वाहन प्लॅटफार्ममध्ये टाकण्यात येईल. येथून संबंधित आरटीओकडे हे अर्ज जातील. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स परमिटसाठी सध्याच्या नियमांतर्गत मेडिकल सर्टिफिकेट आणि वैध वीजाची माहिती द्यावी लागते. नव्या दुरूस्तीनुसार ज्यांच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स आहे, त्यांना आता मेडिकल सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही.

30 दिवसात द्याव्यात नोटिफिकेशनवर सूचना
अनेक देशात वीजा ऑन अरायव्हल म्हणजे एयरपोर्टवर पोहचल्यावर वीजा उपलब्ध करण्याची व्यवस्था होते. अशा स्थितीत लोकांकडे अगोदरपासून वीजा नसतो. अशा प्रकरणात सुद्धा आयपीडीच्या रिन्यूएबलसाठी वीजाची माहिती देणे आवश्यक असणार नाही. मंत्रालयाने या ड्राफ्ट नोटिफिकेशनवर 30 दिवसांच्या आत म्हणजे 6 नोव्हेंबरपर्यंत सर्व हितधारकांकडून सूचना मागवल्या आहेत. हितधारकांनी आपल्या सूचना रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांना मेल किंवा पत्त्यावर पाठवायच्या आहेत. सोबतच देशातसुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स आणि मोटर वाहनांच्या कागदपत्रांची वैधता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.