7th Pay Commission : सरकारी कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी, जुलैपासून मिळू लागेल महागाई भत्त्यातील वाढीचा लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे मागील वर्षी महागाई भत्त्याचे दोन्ही हप्ते जारी करण्यात आले नव्हते. यावेळी सुद्धा अजूनपर्यंत डीएमध्ये किती वाढ होईल याची घोषणा झालेली नाही. परंतु, सरकारने स्पष्ट केले आहे की, तिनही हप्त्यांचा लाभ 1 जुलैनंतर तीन हप्त्यात दिला जाईल.

जानेवारीपासून जुलै 2020 (3 टक्के) आणि जुलैपासून डिसेंबर 2020 (4 टक्के) डीए केंद्रीय कर्मचार्‍यांना कोरोनामुळे मिळू शकला नाही. आता जानेवारीपासून जुलै 2021 च्या महागाई भत्त्याची घोषणा होणार आहे जी 4 टक्के असू शकते. एकुण 17 टक्के डीए जो आता मिळत आहे आणि (3+4+4) मिळून 28 टक्के होऊ शकतो.

डीएमध्ये वाढीच्या घोषणेसह पेन्शनर्सला सुद्धा याचा लाभ होईल. आकड्यांनुसार सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाखांपेक्षा जास्त पेन्शनर्सला याचा लाभ मिळेल.

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसह नवे कामागार कायदे सुद्धा लागू होऊ शकतात. नवे कामागार कायदे संसदेत पास होऊ शकतात आणि त्यांना मोदी सरकार 1 एपिलपासून लागू करणार आहे. याचा परिणाम हातात येणार्‍या सॅलरीवर पडणार आहे.

डीएमध्ये वाढीची घोषणा होताच तुमच्या सॅलरीवर याचा पूर्ण परिणाम होईल. नियमांनुसार, मुळ वेतनाच्या हिशेबानेच पीएफ आणि ग्रॅच्युटी कापली जाते. नव्या वेज कोडनुसार सीटीसीमध्ये मुळ वेतन 50 टक्केपेक्षा कमी असू नये.