उस्मानाबाद : केंद्र शासनाकडून पालिकेला 16 कोटी 60 लाख रुपयांची शाब्बासकी, मिळालं बक्षीस

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र शासनाकडून शहरात विविध विकास कामे केली जातात. त्यासाठी केंद्राकडून निधी दिला जातो. दिलेला निधी किती खर्च केला, किती काम पूर्ण केले. नेमून दिलेल्या निकषांमध्ये काम झाले की नाही. नियमानुसार योग्य कामे करणे, नागरी सुविधा अपेक्षित वेळेत देणे, यासह विविध निकषांना गृहीत धरून केंद्र शासनाने राज्यातील नगरपालिकांना अनुदान जाहीर केले आहे.

यामध्ये उस्मानाबाद नगरपालिकेला केंद्र शासनाने 16 कोटी 60 लाख 23 हजार 303 रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. पालिकेने गेल्या अडीच वर्षांमध्ये केलेल्या कामाची पावती म्हणून केंद्र सरकारकडून हे अनुदान देण्यात आले आहे. शासनाच्या नगर विकास विभागाने 4 सप्टेंबर 2019 रोजी हा आदेश काढला आहे. 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीने 2017-2018 या वार्षिक कार्याचा आढावा घेवून निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील विकास कामांना चालना मिळणार आहे. पालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी वेळोवेळी केलेली कामे तसेच शहरातील नागरिकांनी केलेले सहकार्य यातूनच हा निधी मिळाला.

आरोग्यविषयक वृत्त –