31 मार्च अगोदरच करा Aadhaar- PAN लिंक नाहीतर बसेल मोठा फटका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आताच्या काळात आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे खूप महत्वाचे कागदपत्रे आहेत. जर तुम्हाला कोणताही मोठा किंवा छोटा व्यवहार करायचा असेल तर ही दोन्ही कागदपत्रं तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून या अगोदरच ही दोन्ही कागदपत्रे एकमेकांना लिंक करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सध्या पॅन नंबरला आधार क्रमांकाशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२१ आहे. जर तुम्ही तुमचे पॅन आधारशी लिंक केले नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या. नाहीतर ज्यांनी आपले पॅन आधारशी लिंक केले नसेल त्यांचे पॅनकार्ड १ एप्रिल २०२१ पासून डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यात येईल. यामुळे तुम्हला मोठा फटका बसेल तसेच तुमच्यावर दंड सुद्धा आकारण्यात येईल.

३१ मार्चपूर्वी आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक न केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे आयकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जर पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बाद ठरवण्यात येईल. आयकर विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२१ नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड जर तुम्ही वापरले तर तुमच्यावर कलम २७२ बी अंतर्गत १०,०००रुपये दंड आकारला जाईल. त्यामुळे जर करदात्यांनी ३१ मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बाद करण्यात येईल. जर तुमचे पॅनकार्ड बाद झाले तर तुम्हाला बँकेचा कोणताही व्यवहार करता येणार नाही.

बँकेत लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे खूप महत्वाचे कागदपत्रे आहेत. सध्या बँकेत ५० हजार रुपयांच्या वरील व्यवहारांसाठी पॅनकार्ड द्यावे लागते. पण जर तुम्ही ३१ मार्च २०२१ पूर्वी जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नाही केले तर तुमचे पॅन कार्ड रद्द होईल.आणि तुम्हाला तो व्यवहार करता नाही येणार. आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणे हे खूप सोपं असून तुम्ही घरबसल्या देखील ते करू शकता.

अशा प्रकारे करा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक

१) आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर मेसेज करावा लागेल.

२) यामध्ये १२ आकडी आधार क्रमांक आणि १० आकडी पॅन क्रमांक टाकून तुम्ही वरील क्रमांकावर मेसेज पाठवू शकता.

३) तुम्ही UIDAIPANABCDXXXXXXXXXX ABCXXXXXXX अशा पद्धतीने तुम्ही मेसेज करू शकता. यामध्ये सुरुवातीला आधार क्रमांक टाकला आहे तर शेवटी पॅन कार्ड नंबर टाकला आहे.