सामंत गोयल ‘RAW’चे प्रमुख तर ‘IB’च्या प्रमुखपदी अरविंद कुमार

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – पुन्हा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने बुधवारी देशाच्या गुप्तचर विभागात नवी नियुक्ती केली आहे. सरकारने १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांची इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) तर १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांची ‘रॉ’ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदीच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने त्यांच्या नावाला परवानगी दिली आहे. पंतप्रधान कार्यालयालच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले की, गृह मंत्र्यांनी नियुक्तीसाठी आवश्यक फाइलवर स्वाक्षरी केल्या आहेत आणि आता त्या फाइल पीएमओ कडे पाठवण्यात आल्या आहे.

गोयल यांचा ‘या’ कारवायांमध्ये समावेश –

अरविंद कुमार यांना काश्मीरमधील विविध प्रकरणाबाबत माहिती असल्याचे मानले जाते. एवढेच नाही तर नक्षलवादी भागात महत्वाच्या रणनिती आखण्यात ते तरबेज आहेत. ते आताच्या आयबी चीफ राजीव जैन यांची जागी पदभार स्वीकारतील. तर गोयल हे सध्याचे रॉ प्रमुख अनिल कुमार धस्माना यांच्या जागी पदभार स्वीकारतील. गोयल यांंनी पाकिस्तानविरोधात २०१६ च्या उरी हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि २०१९  मध्ये पाकिस्तानातील बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.

एअर स्ट्राइकच्या तीन महिन्यानंतर त्यांना उच्चपद देण्यात आले. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायूसेनेने बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक हल्ला केले. या हल्ल्यानंतर सरकारने या एअर स्ट्राइकमध्ये ३०० ते ४०० दहशतवादी मारल्या गेल्याचे सांगितले आहे.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक