प्रदुषणमुक्त भारत ! 64 शहरामध्ये धावणार 5500 ‘इलक्ट्रिक’ बस, केंद्र सरकारची मंजूरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थसंकल्पात केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना महत्त्व दिल्याचे आपन पाहिलेच आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने देशातील ६४ शहरांमध्ये ५ हजार इलेक्ट्रिक बस चालविण्यास मान्यता दिली आहे. या इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीमध्ये केंद्र सरकारकडून राज्य सरकारला आर्थिक मदत करण्यात येईल. विद्युत बस खरेदीसाठी केंद्राकडून ३५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नुकतीच केंद्र सरकारने फेम-२ योजनेला सुरूवात केली आहे. या योजनेअंतर्गत विद्युत वाहने चालविण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अनुदान दिले जाते. फेम-२ योजनेंतर्गत येत्या तीन वर्षात १० हजार कोटी अनुदानाची तरतूद सरकारने केली आहे. यंदा १ एप्रिलपासून देशात फेम-२ अस्तित्वात आणण्यासाठी सुरुवात केली आहे.

सध्या या योजने अंतर्गत दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबादला प्रत्येकी ३०० बस मिळणार आहेत. त्यातील ४०० बस शहरांतर्गत असणार आहे. तर १०० बस दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची शेवटची मैल कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

योजनेतील पहिल्या टप्प्यात सरकार ७ मोठ्या शहरांसाठी ही योजना सुरू करणार आहे. त्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. ४ दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कमीतकमी ३०० बस सुरू करण्यात येतील. तर १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात कमीतकमी १०० बस सुरू केल्या जातील, तर त्यामध्ये ४५ शहरे समाविष्ट केली जातील. तसंच याशिवाय विशेष श्रेणी राज्यासह अन्य शहरांमध्ये ५० बसगाड्या सुरू केल्या जातील.

दरम्यान, केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या आकाराच्या बस खरेदीसाठी वेगवेगळे अनुदान दिले जाणार आहे. बसच्या आकारावरून हे अनुदान ठरवण्यात आले आहे. १० ते १२ मीटर लांबीची स्टँडर्ड इलेक्ट्रिक बस असल्यात तिला ५५ लाख रुपये अनुदान दिले जाईल. ८ ते १० मीटर लांबीची इलेक्ट्रिक बस असल्यास ४५ लाख रुपये देण्यात आली. तर मिनी इलेक्ट्रिक बस असल्यास ३५ लाख रुपये अनुदान देण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like