सरकारनं दिली मोबाईल उत्पादनाच्या 16 प्रस्तावांना मंजूरी, 11 हजार कोटी रूपयांचं दिलं जाणार ‘प्रोत्साहन’

पोलिसनामा ऑनलाईन – सरकारने मंगळवारी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजने अंतर्गत मोबाईल उत्पादनाच्या १६ प्रस्तावना मंजुरी दिली.या योजने अतंर्गत देशी विदेशी कंपन्यांना ११ हजार करोड रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातील.आणि ५ वर्षात १०.५ लाख करोड रुपयांचे मोबाईल उत्पादन होणार आहे.

५ वर्षात १०.५ लाख करोड रुपयांचे मोबाईल उत्पादन

सूचना आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने लावा,मायक्रोफोन,डिक्सन टेकनॉलॉजिज,युटीएल नियोलिंक्स,आणि ऑप्टिमस सारख्या घरगुती उत्पादनांसमवेत अँपल ची सहयोगी कंपनी फॉक्सकॉन हनहाई,विस्ट्रॉन,पेजाट्रोन,सॅमसंग आणि राईसिंग स्टार सारख्या विदेशी कंपन्यांनाच्या प्रस्तावाला देखील मंजुरी दिली आहे.य योजने अंतर्गत २ लाख प्रत्यक्ष लोकांना रोजगार मिळणार आहे तर अप्रत्यक्षरित्या ६ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.योजनेअंतर्गत सरकारजवळ २३ प्रस्ताव आले होते,त्यात १६ प्रस्तवानं मंजुरी दिली आहे.हि योजना एप्रिल २०२० मध्ये सूचिबद्ध केले होते ज्यात ४ ते ६ % प्रोत्साहन देणार आहे.