अपघात रोखण्यासाठी केंद्राचे ‘कडक’ पाऊल ; नियमांचे उल्लंघन केल्यास ‘कठोर’ कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात वाढत चालेले रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक पाऊल उचलले आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी आज लोकसभेत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोटार वाहन दुरुस्ती विधेयक सादर केले. या विधेयकामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास अधिक कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रस्ते बांधकाम आणि देखभाल करण्याची कमतरता यामुळे होणाऱ्या अपघातांसाठी पहिल्यांदाच दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

२०१५, २०१६ आणि २०१७ मध्ये रस्ते अपघातात देशात ३ लाख १२ हजार ४९४ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारने अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर तरतुदी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वाढविण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात देखील वाढ करण्यात आली आहे. आता अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर १० लाख तर गंभीर जखमी झाल्यास ५ लाख रुपये मिळणार आहेत.

वाहतूक नियमातील दंड

मद्यपान करून गाडी चालवल्यास दंड २ हजारावरून १० हजारापर्यंत वाढवण्याची तरतूद
हेल्मेट न घालता गाडी चालवल्यास १ हजार रुपये दंड आहे. आता दंड कायम ठेवत तीन महिने वाहतूक परवाना रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
बेदरकारपणे गाडी चालविण्याचा दंड १ हजारावरून ५ हजार करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
वाहतूक परवान्याशिवाय गाडी चालवल्यास ५०० रुपयांवरून ५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.
अतिवेगात गाडी चालवल्यास ५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
गाडी चालवताना सीट बेल्ट न लावल्यास १०० रुपयांवरून १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास ५ हजार रुपये दंड
आपत्कालीन वाहनाला मार्ग न दिल्यास १० हजार रुपये दंड
अल्पवयीन गाडी चालवताना पकडल्यास त्याच्या पालकांना किंवा मालकाला २५ हजार रुपये दंड किंवा ३ वर्षाचा तुरुंगवास.

विधेयकातील महत्त्वाचे बदल

वाहन परवान्यासाठी किंवा नोंदणीसाठी आधार नंबर अनिवार्य
वाहन परवान्याची वैधता संपल्यास नुतनी करणासाठी एक वर्षाचा अवधी मिळणार
रस्त्याची चुकीची रचना, चुकीचे बांधकाम किंवा देखभालीत कमतरतेमुळे अपघात झाल्यास ठेकेदार आणि सल्लागार, नागरिक संस्थांना जबाबदार धरले जाणार
अशा अपघातांच्या भरपाई दाव्याची पुर्तता सहा महिन्यात करणे अनिवार्य असणार आहे.
गाडीच्या गुणवत्तेमुळे अपघात जाल्यास सर्व गाड्या मार्केटमधून परत घेण्याचा अधिकार सरकारकडे आहे. तसेच वाहन निर्मीती करणाऱ्या कंपनीला ५०० कोटी पेक्षा अधिकाचा दंड लागू शकतो.

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही