मंत्री अनिल परब यांचा मोदी सरकारवर ‘घणाघात’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रातले सरकार हे शेतकऱ्यांना अतिरेक्यांची उपमा देत आहेत. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नेस्तनाबूत करणाऱ्या रानडुकरासारखे हे केंद्र सरकार काम (The central government is like a bull that destroys the farmers’ vertical crop) करत आहे आणि गडकरी हे त्यांच्यासोबत आहेत. बैल किमान शेतकऱ्यांचा मित्र तरी असतो, आघाडी सरकार बैलासारखे असले तरी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. मात्र आपण रानडुकराची भूमिका बजावणाऱ्या सरकारचा भाग आहात तेव्हा आधी आपले पाहा, असा टोला शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Shiv Sena spokesperson and Transport Minister Anil Parab) यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Land Transport Minister Nitin Gadkari) यांना लगावला आहे.

राज्यातील आघाडी सरकारला बैलाची उपमा देवून स्वतःची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्याच केंद्रातील सरकारच्या कारभाराबाबत कदाचित अनभिज्ञ असल्याची टीका परब यांनी केली आहे.
दरम्यान, राज्य सरकार म्हणजे खट्या (बिनकामाचा) बैल आहे. तुतारी टोचल्याशिवाय चालत नाही. थोडीशी तुतारी काढली की ते थांबते. अशा सरकारला तुतारी टोचण्यासाठी चांगले लोकप्रतिनिधी विधान परिषदेत पाठवा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी भाजपाच्या पदवीधर निवडणूक मेळाव्यात बोलताना केले होते. त्यावरून परब यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

You might also like