३ कोटी विद्यार्थ्यांच्या ‘सोशल मिडीया’वर केंद्र सरकारचा ‘वॉच’, ९०० विश्‍वविद्यालय, ४० हजार कॉलेजला ‘सूचना’

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरातील विश्‍वविद्यालय आणि कॉलेजातील तब्बल ३ कोटी विद्यार्थ्यांच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवर केंद्र सरकार नजर ठेवुन आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार हा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांशी सोशल मिडीयावर संबंध ठेवुन त्यांच्या आणि संस्थेच्या चांगल्या कामाची माहिती प्रसारित करण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे.

काय आहे रिपोर्टमध्ये –

इंग्रजी वर्तमानपत्र टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, सरकारच्या या उपक्रमावर काही शिक्षण तज्ञांनकडून चिंता व्यक्‍त केली जात आहे. शिक्षण क्षेत्रातील या जाणकारांना सरकारच्या या उपक्रमाबाबत भलतच काहीतरी वाटत असुन त्यांना विद्यार्थ्यांच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवरून घेण्यात येणार्‍या माहितीचा दुरूपयोग करून त्यांची विचारधारा जाणून घेतल्यानंतर त्यांना फॅकल्टी इंटरव्यूच्या वेळी गाळले जाईल अशी शंका आहे. विश्‍वविद्यालयातील एका प्राध्यापकाने दिलेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्याला त्याच्या फॅकल्टी इंटरव्यूच्यानंतर रिजेक्ट करण्यात आले होते. संबंधित विद्यार्थ्याच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवर सरकार विरोधी कमेंट होत्या म्हणून असे करण्यात आल्याची शंका देखील उपस्थित करण्यात आली आहे.

सचिवांनी दिलं पत्र –

इंग्रजी वर्तमानपत्राच्या रिपोर्टनुसार सर्व उच्च शैक्षणिक संस्थानांच्या प्रमुखांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांचे फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंट संस्था आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाशी जोडण्याबाबत प्रमुखांना सूचना देण्यात आली आहे. यासंदर्भात डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशनचे सचिव आर. सुब्रबमण्यम यांच्याकडून एक पत्र देखील पाठविण्यात आले आहे. याबाबत देशातील ९०० विश्‍वविद्यालय आणि ४० हजार कॉलेज्सला सूचना देण्यात आली आहे. विद्यार्थी आणि संस्थेचे चांगले काम लोकांपर्यंत जावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सचिवांच्या पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहे.

प्रत्येक संस्थेत मिडीया चॅम्पीयनची नियुक्‍ती –

प्रत्येक संस्था त्यांच्याकडून एकाची नेमणुक मिडीया चॅम्पीयन अथवा एसएससी म्हणून करू शकते. नेमणुक करण्यात आलेला मिडीया चॅम्पीयन अथवा एसएससी मानव संसाधन मंत्रालयाच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या आणि संस्थेच्या चांगल्या कामांना जास्तीत जास्त शेअर करेल. मिडीया चॅम्पीयन अथवा एसएससी यांनी नेमकं काय करावे हे देखील सचिन सुब्रमण्यम यांच्या पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहे.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय