सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; मोदी सरकार होळीपूर्वीच करणार ‘ही’ घोषणा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारकडून लवकरच सरकारी कर्मचा-यांना खूश खबर मिळणार आहे. मोदी सरकार होळीच्या पूर्वीच महागाई भत्ता वाढवण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे 50 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 60 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 17 टक्के डीए मिळत असून, यात 4 टक्के वाढ करत ती 21 टक्क्यांपर्यंत केली जाणार आहे. जानेवारी ते जून 2021 या कालावधीत डीएमध्ये वाढ केली जाईल. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

कर्मचारी सरकारद्वारे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीअंतर्गत महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याच्या घोषणेची वाट पाहत आहेत. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्सची घोषणा आणि केंद्रीय बजेट 2021 सादर झाल्यानंतर महागाई भत्ता, महागाई दिलासा आणि उर्वरित क्लिअरन्सवर मोदी सरकारकडून होणाऱ्या मोठ्या घोषणेवर साऱ्यांच्या नजरा टिकून आहेत. सध्या कर्मचा-यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. सरकार महागाई भत्ता 4 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांना खूश करण्यासाठी सरकार महागाई दिलासामध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.