Central Government Employees | लाखो सरकारी कर्मचारी आणि अधिकार्‍यांना मिळणारी ‘ही’ सुविधा 8 नोव्हेंबरपासून बंद; जाणून घ्या नवीन नियमावली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Central Government Employees | केंद्र सरकारने कोरोना काळात कर्मचारी आणि अधिकार्‍यांना (Central Government Employees) महामारीचा विचार करता काही सुविधा दिल्या होत्या. आता महामारीचा जोर कमी झाल्याने व्यवस्था पुन्हा पुर्ववत करण्याकडे सरकारचा कल आहे. या पार्श्वभूमीवर सरकार कोरोना काळात दिलेल्या सवलती 8 नोव्हेंबरपासून बंद करत आहे.

 

उद्यापासून बायोमेट्रिक हजेरी

 

या बदलानुसार सरकारी कर्मचार्‍यांना (Central Government Employees) आता कार्यालयात पूर्णवेळ हजर राहावे लागेल. तसेच हजेरीसाठी बायोमेट्रिक हजेरी (Biometric Attendance) प्रणाली उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबत सर्व केंद्रीय कार्यालयांमध्ये नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.

Biometric Attendance

 

उपसचिवांनी दिली माहिती

 

याबाबत माहिती देताना भारत सरकारचे उपसचिव उमेश कुमार भाटिया (Deputy Secretary Umesh Kumar Bhatia) यांनी म्हटले की, कोरोना महामारीच्या काळात कार्यालयात कर्मचारी (Central Government Employees) संख्या कमी करणे, कामाचे तास कमी करणे अशा सवलती यापूर्वीच बंद केल्या असून 8 नोव्हेंबरपासून प्रत्येक कर्मचार्‍याला आता बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी लागणार आहे.

 

कर्मचार्‍यांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वात काय म्हटलेय…

 

  • बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवणे आवश्यक.
  • बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्यापूर्वी आणि नंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत.
  • हजेरी नोंदवताना आपसात 6 फुटांचे अंतर राखावे.
  • प्रत्येकवेळी मास्क घालणे अनिवार्य.
  • बायोमेट्रिक मशीनचे टचपॅड वारंवार स्वच्छ करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करावा.
  • हजेरी नोंदवणार्‍या कर्मचार्‍यांना हे नियुक्त कर्मचारी मार्गदर्शनही करतील.
  • बायोमेट्रिक मशीन संदर्भात सूचना देणारे परिपत्रक केंद्र सरकारकडून जारी.
  • बायोमेट्रिक मशीन मोकळ्या वातावरणात ठेवावी.
  • मशीन आत असेल तर त्याठिकाणी पुरेसे नैसर्गिक व्हेंटिलेशन असावे.

 

Web Title : Central Government Employees | central government resume biometric attendance staff nov 8

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Cyber Crime Prevention Tips & Tricks | ‘या’ 5 पद्धतीने ठेवा आपला फोन सुरक्षित, सायबर गुन्हेगारीसारखी समस्या राहील दूर

Body Detoxification Tips | दिवाळीचा ‘फराळ’, ‘मिठाई’नं ‘आरोग्य’ बिघडवलंय का? ‘या’ 8 पद्धतीने बॉडी करा ‘डिटॉक्स’

EPFO चा कोट्यवधी खातेदारांना अलर्ट ! सोशल मीडियावर कधीही शेयर करू नका ‘ही’ माहिती, अन्यथा होईल मोठं नुकसान; जाणून घ्या