central government employees news | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! DA मधील वाढीनंतर 32400 रुपयांनी वाढणार सॅलरी, जाणून घ्या कशी?

नवी दिल्ली (central government employees news) : वृत्तसंस्था –  महामागाई भत्त्याची प्रतिक्षा करत असलेल्या लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (central government employees news) मोठी खुशखबर आहे. केंद्र सरकार (Central government) 26 जूनला डीए (Dearness allowance) मधील वाढीबाबत बैठक घेईल, ज्यानंतर सॅलरी (Salary hike) मध्ये सुमारे 32400 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. मोठ्या कालावधीपासून डीएची प्रतिक्षा करत असलेल्या कर्मचार्‍यांच्या खात्यात सरकार लवकरच हे पैसे ट्रान्सफर करेल. सॅलरीमधील ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) अंतर्गत होईल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

1 जुलैनंतर कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 17 टक्केने वाढून 28 टक्के होईल म्हणजे तुम्हाला थेट दोन वर्षाचा महागाई भत्ता मिळेल. केंद्र सरकार (central government ) मागील वर्षापासून फ्रीज डीएचे 3 हप्ते जारी करेल. कशा प्रकारे तुमच्या सॅलरीत 32400 रुपयांची वाढ होईल ते जाणून घेवूयात…

18 महिन्यानंतर होणार वाढ

सुमारे 18 महिन्यानंतर कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ होणार आहे.
मागील वर्षी देशभरात पसरलेल्या कोरोनामुळे कर्मचार्‍यांचा डीए फ्रीज करण्यात आला होता.
जानेवारी 2020 मध्ये डीएमध्ये 4 टक्केची वाढ करण्यात आली होती.
यानंतर दुसर्‍या सहामाहीत म्हणजे जून 2020 मध्ये 3 टक्केची वाढ झाली होती.
आता जानेवारी 2021 मध्ये हा 4 टक्के वाढला आहे.
म्हणजेच एकुण वाढून 28 टक्केवर पोहचला आहे.

किती वाढेल तुमची सॅलरी

तुमची सॅलरी किती वाढेल हे पहायचे असेल तर पे-मॅट्रिक्सच्या हिशेबाने किमान सॅलरी 18000 रुपये आहे.
यामध्ये 15 टक्के महागाई भत्ता जोडला जाण्याची अपेक्षा आहे.
म्हणजे तुमचे थेट दर महिना 2700 रुपये वाढू शकतात.
म्हणजे तुमची वार्षिक सॅलरी 32400 रुपयांनी वाढेल.
ही वाढ डीएच्या रूपात होईल.

Health Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन?

लवकरच 32 टक्के होऊ शकतो महागाई भत्ता

यानंतर जून 2021 च्या महागाई भत्त्याची घोषणा सुद्धा केली जाणार आहे.
सूत्रांनुसार, तो 4 टक्केपर्यंत वाढू शकतो.
जर असे झाले तर तो 1 जुलैला तीन हप्त्यांत दिल्यानंतर पुढील सहा महिन्यात 4 टक्के आणखी दिला जाईल, ज्यानंतर कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता वाढून 32 टक्केपर्यंत पोहचू शकतो.

केव्हा होईल बैठक

The National Council (JCM) नुसार, 26 जून 2021 ला अर्थ मंत्रालयाचा खर्च विभाग, कामगार आणि प्रशिक्षण विभागाचे (DoPT) अधिकारी आणि जेसीएमच्या प्रतिनिधींची एक अधिकृत बैठक होईल. सूत्रांनुसार संमेलनाचे अध्यक्षस्थान भारताचे कॅबिनेट सचिव भूषवतील. बैठकीच्या अजेंडाबाबत जेसीएमच्या राष्ट्रीय परिषदेचे शिव गोपाल मिश्रा यांनी म्हटले की, बैठकीत केंद्र सरकारचे कर्मचारी आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या 7व्या CPC DA आणि 7व्या CPC DR लाभांवर (7th pay commission) चर्चा केली जाईल. अगोदर ही बैठक 8 मे रोजी होणार होती, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे ती पुढे ढकल्याने आली होती.

 

Web Title : central government employees news salary may hike 32400 rupees yearly after da hike check the calculation

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Modi Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळातून राज्यातील 2 मंत्र्यांना डच्चू? ‘या’ दोघांना मिळणार संधी