पुरंदरेंच्या शिवसृष्टीला केंद्राकडून पाच कोटींची मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतुन उतरणारी शिवसृष्टी कात्रज भागात उभारली जाणार असून नितीन गडकरी मंत्री असलेल्या खात्याकडून जेएनपीटी अंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. शनिवारी पुणे आयुक्त कार्यालयात नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

राज्य सरकारने पुण्यातील बावधन भागातील बीडीपीच्या जागेवर 50 एकरात शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कुठलीही हालचाल सरकारकडून झालेली नसून, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन खात्याने पुरंदरेंच्या शिवसृष्टीला विशेष प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे निर्माण होणार आहेत.