काश्मीरप्रमाणेच केंद्र सरकारनं राम मंदिराबाबत धाडसी निर्णय घ्यावा : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  आम्ही पहिल्यापासूनच राम मंदिराबाबत आग्रही आहोत, कोर्टात अंतिम सुनावणी सुरु आहे, कोर्ट योग्यच निर्णय घेईल. मात्र केंद्र सरकारने लवकरच धाडसी पाऊल उचलावे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.

राम मंदिराबाबत विशेष कायदा करून लवकर सरकारने निर्णय घ्यावा. तसेच ज्या प्रमाणे काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला अगदी त्याप्रमाणेच सरकारने राम मंदिराबाबतही निर्णय घ्यावा असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

आज सामनाच्या अग्रलेखातून उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर चांगलीच टीका करण्यात आली होती. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की उदयनराजेंचा अपमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता मात्र त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.

सध्या मुबंईत जोरदार गाजत असलेल्या आरेच्या वादाबद्दल उद्धव ठाकरे यांना विचारले असता ‘आरेचे ही नाणार प्रमाणे होणार’ असे ठाकरे यावेळी म्हणाले. आरेवरून आता आगामी काळात भाजप-सेना वाद पुन्हा सुरु होणार की काय ? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी आरेतील वृक्ष तोडण्याला मोठा विरोध केला आहे.