आरोग्य सेतु : व्हॅक्सीनसाठी नोंदणी करणे आता होईल सोपे

नवी दिल्ली : कोरोना व्हॅक्सीन बाबत लोकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर सरकारने आरोग्य सेतु मोबाइल अ‍ॅपमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. या मोबाइल अ‍ॅपवर लोकांसाठी नोंदणी प्रक्रिया सोपी करण्याच्या उद्देशाने सरकारने थेट पर्याय जोडला आहे.

आतापर्यंत आरोग्य सेतु अ‍ॅपवर व्हॅक्सीन नोंदणी आणि त्याच्याशी संबंधीत माहितीसाठी एकच पर्याय होता, ज्यामध्ये जाऊन नोंदणीची निवड करण्यात अडचण येत होती. परंतु आता अ‍ॅपवर तिसरा पर्याय व्हॅक्सीनेशनचा ठेवला आहे, ज्यावर क्लिक करताच यूजरला त्याचा फोन नंबर विचारला जाईल.

फोन नंबर देताच ओटीपीची लिंक येईल आणि ओटीपी दिल्यानंतर आवश्यक प्रक्रिया सुद्धा सुरू होईल. अशाप्रकारे कुणीही साधारण व्यक्ती सहजपणे कमी वेळात आपली नोंदणी व्हॅक्सीनसाठी करू शकतो.

याशिवाय आरोग्य सेतु अ‍ॅपवर एक कोविन पर्याय सुद्धा दिला आहे. येथे व्हॅक्सीनची सूचना, सर्टिफिकेट, डॅशबोर्ड, लॉग इन इत्यादीची माहिती असेल. सोबतच येथे कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकरणांबाबत सुद्धा माहिती दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, ओटीपी मिळाल्यानंतर सर्वप्रथम ओळखपत्राची माहिती द्यावी लागेल. आधार कार्ड, वाहन लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड किंवा वोटर कार्ड सुद्धा वापरू शकता.

यावर छापलेला नंबर सुद्धा द्यावा लागेल. यानंतर लाभार्थीचे नाव, जन्म तारीख इत्यादी माहिती द्यावी लागेल. या प्रक्रियामध्ये एका व्यक्तीला कमाल दोन ते तीन मिनिटांचा वेळ लागू शकतो. यानंतर व्हॅक्सीनेशन सेंटर, वेळ आणि व्हॅक्सीन देण्याचा दिनांकाचा मॅसेज फोनवर मिळेल.