आधी निर्यात बंदी, आता परदेशी कांदा उत्पादकांना देशात पायघड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   केंद्र सरकारने (Central Government) मागील महिन्यात कांद्यावर (onion) निर्यातबंदीचा निर्णय घेतला. ही निर्यातबंदी (import) तातडीने लागू करण्याच परिपत्रक काढण्यात आले. कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा (farmer) रोष असताना आता देशाबाहेरच्या कांदा उत्पादकांना देशात पायघड्या घातल्या जात आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सध्या कांद्याचे भाव वाढल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये कांद्याचा घाऊक भाव 90 रुपयांच्या घरात गेला आहे. तर लवकरच कांदा शंभरी गठण्याची शक्यता आहे. आता सरकारने कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. हे सगळं कांद्याला चार महिन्यापूर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून बदलल्यानंतर सुरु आहे.

शेतकऱ्यांच्या कांद्याचे करायचे काय ?

मागील दहा दिवसांमध्ये कांद्याचे भाव 12 रुपायांवरून 50 रुपयांच्या जवळपास पोहचले आहेत. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचा केंद्राचा दावा आहे. जे कांदा उत्पादक देश आहेत तेथून भारतातल्या आयातीसाठी त्या-त्या दूतावासांना विशेष आदेश देण्यात आले आहेत. तसेच आयातीवरच्या कांद्याला लागणारी इन्स्पेक्शन फी देखील माफ करण्यात आली आहे. दुसऱ्या देशातून कांदा आयात केल्याने आपल्या देशातील कांद्याचा भाव पडण्याची शक्यता आहे. मग कांदा जीवनावश्यक यादीतून वगळून केंद्राने काय साध्य केलं ? असा सवाल केला जातोय. भाव वाढले की आधी निर्यात बंदी केली. त्यातूनही भाव वाढले तर आयातीला परवानगी दिली. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे करायचे तरी काय असा सवाल शेतकरी करत आहेत.

मोदी पंतप्रधान आहेत की दलाल – राजू शेट्टी (raju shetti)

शेतकऱ्यांना मारण्याचं धोरण सरकारचं आहे. एका बाजूला कांद्याची निर्यांतबंदी केली. शेतकऱ्यांसाठी हा दुर्दैवी निर्णय आहे. दुसरीकडे भाजपची (BJP) सत्ता असलेल्या कर्नाटकामध्ये कांदा निर्यातीला परवानगी दिल्याची माहिती आहे. आता पुन्हा परदेशातून कांदा आयातीच्या हालचाली सुरु केल्यात. हे तर दलालांना पोसायचे धंदे आहेत. देशात कांद्याची आवश्यकता होती तर कर्नाटकचा, बेंगलोरचा कांदा निर्यातीला परवानगी का दिली ? नाशिकच्या कांद्याला निर्यातीला बंदी घातली, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले. महाराष्ट्राच्या द्वेषाने केंद्राला पछाडलं आहे. कांदा म्हणजे महाराष्ट्र हे सूत्र आहे. पंतप्रधान मोदी हे निवडून आलेले पंतप्रधान आहेत का दलाल, हेच कळत नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

कांदा आयात करणे हा पर्याय नाही – सदाभाऊ खोत (sadabhau khot)

आपल्या कांद्याला वाहतूक अनुदान देऊन परदेशात पाठवण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे कांदा उत्पादक नैराश्येत येणार नाहीत. कांद्याला किमान 20 रुपयांवर भाव द्यावा. कांदा आयात हा पर्याय नाही, असे सदाभाऊ खोत म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन निर्णय – अजित नवले

बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान होणार आहे. अगोदरच कोरोना महामारीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर मोठा आघात होणार असल्याची प्रतिक्रिया किसान सभेचे अजित नवले यांनी दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like