#PulwamaTerroristAttack : ‘त्या’ फुटीरतावाद्यांचे संरक्षण केंद्र सरकारने घेतले काढून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सुरक्षेच्या संदर्भात हालचालीला वेग आला आहे. अशातच केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. काश्मीरमधील दहशतवादाला खतपाणी घालणारे तसेच आयएसआयशी कनेक्शन आणणाऱ्या फुटीरतावाद्यांची केंद्र सरकारने सुरक्षा काढून घेतली आहे. सरकारच्या वतीने पुरवण्यात येणारे अंगरक्षक सरकारने माघारी बोलावले आहेत.

मीरवाइज उमर फारूख, अब्दुल गनी बट्ट, हाशिम कुरैशी, बिलालकेंद्र सरकार लोन आणि शब्बीर शाह या काश्मीर मधील पाच फुटीरतावादी नेत्यांचे केंद्र सरकारने संरक्षण काढून घेतले आहे. त्यामुळे फुटीरतावादी देशविघातक चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

जम्मू काश्मीरचा दौरा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला मदत करत असलेल्या फुटीरतावादी नेत्यांनाचे आम्ही संरक्षण काढून घेणार आल्याचे संकेत दिले होते. गृह सचिवांनी फुटीरतावादी नेत्यांचे संरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेतला असून संबंधित पाच फुटीरतावादी नेत्यांचे संरक्षण काढण्याचे आदेश कश्मीर पोलीसांना जारी करण्यात आले आहेत.