चार राज्यात कोरोना लसीकरणाची होणार ट्रायल, 28 डिसेंबरपासून होणार सुरुवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीला केंद्र सरकारने कोरोना लसीकरण सुरू करण्यापूर्वी चाचणी करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने देशातील चार राज्यात लसीकरणाच्या ट्रायलची योजना बनवली.आगामी 28 ते 29 डिसेंबरदरम्यान पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या दोन-दोन जिल्ह्यात चाचणी होईल. मंत्रालयानुसार या राज्यांमध्ये चाचणीची तयारी पूर्ण झाली आहे.

मंत्रालयानुसार, सध्या कोणत्याही लसीला अंतिम मंजूरी देण्यात आलेली नाही. परंतु बहुतांश राज्यात तयारी पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 30 कोटी लोकांना लस दिली जाईल. मृतांचा आकडा सर्वात जास्त असल्याने पंजाबला प्राथमिकता देण्यात आली आहे. पंजाबमध्ये कोरोना व्हायरसचा मृत्युदर सर्वात जास्त आहे.

सरकारने शुक्रवारपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण संपवण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गत 25 डिसेंबरपर्यंत देशातील 2,360 प्रशिक्षण सत्र पूर्ण करण्यात आले आणि सात हजार जिल्हा निरीक्षकांना प्रशिक्षण पूर्ण घाले. सरकार लसीकरण सुरू करण्यापूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी चाचणी करत आहे.

सरकारला घ्यायचाय तयारीचा आढावा
या चाचणीतून सरकारला लसीसंबंधी तयारीचा आढावा तपासायचा आहे. या प्रक्रियेत कुणालाही लस दिली जाणार नाही परंतु संपूर्ण प्रक्रियेची तपासणी केली जाईल. लोकांच्या नोंदणीपासून लसीचे केंद्रापर्यंत वितरण, यासारख्या प्रक्रिया पूर्ण होतील. या दरम्यान सरकारने नोंदणीबाबत कोविन अ‍ॅप आणि वेबसाइट सुद्धा बनवली आहे. अ‍ॅप सरकारला माहिती देईल की, कुणाला लस द्यायची आहे आणि अ‍ॅपद्वारेच अपॉइन्मेंट मिळेल.

2,360 लोकांना मिळाले राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण
681 जिल्ह्यातील 49,604 कर्मचारी झाले प्रशिक्षित
17,831 मध्ये 1,399 ब्लॉक टीमचे प्रशिक्षण पूर्ण
1075 राष्ट्रीय, 104 राज्य स्तरीय हेल्पलाइन सेवा सुरू
4 राज्यांच्या 2-2 जिल्ह्यांत 2 दिवासात पाच परीक्षण सत्र