मोदी सरकारचा सगळ्यात ‘मोठा’ निर्णय ! सर्व ‘नव्या’ सरकारी ‘योजनां’ना लावला ‘ब्रेक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस या महामारीमध्ये भारत सरकारने पुढच्या वर्षी मार्चपर्यंत कोणतीही नवीन सरकारी योजना लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हे निर्बंध पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि स्वावलंब भारताशी संबंधित योजनांना लागू होणार नाहीत. सरकारने नवीन योजना लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कोरोनामुळे सुरू असलेल्या आर्थिक संकटात भारत सरकार कॉस्ट कटिंग उपाय अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या घोषणांचा खर्च सुरुच राहील.

सरकारचा मोठा निर्णय
कोरोना संकट आणि लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आदेशानुसार मार्च 2021 पर्यंत कोणतीही नवीन योजना सुरु केली जाणार नाही. FY20-21 क्रमवारीत मंजूर झालेल्या किंवा मूल्यांकन केलेल्या सर्व योजनांना हा नियम लागू होणार आहे. शिक्षण विभागाच्या सैद्धांतिक परवानगीसह योजनांचा समावेश आहे. यामध्ये SFC च्या 500 कोटींपेक्षा जास्त नवीन योजनांना देखील ब्रेक लावला जाईल. अर्थ मंत्रालयाने महसूल अभावी हा आदेश दिला आहे. वित्त विभागाच्या खर्चाच्या विभागाने हे आदेश 4 जून रोजी जारी केला होता. मंत्रालय आणि विभागांना 30 जूनपर्यंत याद्या सादर करण्यास सांगितले आहे.

20 लाख कोटी रुपयांचं मदत पॅकेज सरकारनं जाहीर केलं
देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारनं आर्थिक सुधारणांसह 20 लाख कोटी रुपयांच पॅकेज जाहीर केलं. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, कोरोना साथीच्या आजाराला सामोरं जाणाऱ्या जगासमोर भारत अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाचं उदाहरण मांडेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like