आता तुम्ही करू शकाल ‘क्रुझ’मधून तीर्थयात्रा, मोदी सरकारचा नवा ‘प्लॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार देशातील वयोवृद्ध लोकांना एकाहून एक अधिक चांगल्या योजना कशा पुरवता येईल याचा सातत्याने विचार करत आहे. वयोवृद्ध लोकांना फिरण्याचे ठिकाण म्हणजे तीर्थयात्रा हे होय. हाच धागा पकडून केंद्र सरकार वयोवृध्दांची तीर्थयात्रा आणखीनच संस्मरणीय करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.

जलमार्गांचा आढावा घेतला जाणार आहे
जहाजबांधणी मंत्री मनसुख मंडाविया यांनी राज्यांना त्यांच्या नागरिकांसाठी असलेल्या तीर्थयात्रेचे मार्ग कळवण्यासाठी सांगितले आहे. त्यांचे मंत्रालय या तीर्थयात्रांचा मार्ग जलमार्गाने करण्यासाठी सुचवेल. सरकार अशी योजना तयार करत आहे, ज्यामुळे तीर्थयात्रा तर झाली पाहिजे सोबतच क्रूझ/जहाजावर बसून थंड हवेच्या लहरींचा आनंद घेत तीर्थयात्रा करणे अविस्मरणीय झाले पाहिजे. या दृष्टिकोनातून सरकार एक योजना तयार करत आहे. या योजनेमध्ये जलमार्गांचा वापर करून तीर्थयात्रा करता येईल अशा ठिकाणचा विचार केला जात आहे. ज्यामुळे क्रूझ पर्यटनाला चालना मिळू मिळेल.

तीर्थयात्रा आता क्रूझच्या माध्यमातून होणार
मंत्री महोदय म्हणाले की, आपल्या देशात काही मोठे तीर्थक्षेत्र आहेत ज्यात सोमनाथ-द्वारका आणि तामिळनाडू मध्ये रामेश्वरम समुद्रकिनारी आहेत. अशा ठिकाणांच्या तीर्थयात्रांसाठी राज्यांनी क्रूझचा वापर करावा असे सुचवले आहे. मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली, राजस्थान या राज्यांमध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा करण्यासाठी योजना आहेत. सरकार या ठिकाणी क्रूझ पर्यटनाला चालना मिळावी यासाठी समुद्रालगत तसेच अंतर्गत जलमार्ग या दोन्ही ठिकाणी क्रूझ पर्यटनासाठी चालना देण्याचा प्रयत्न करत आहे.

खालील ठिकाणी क्रूझ सेवांचा आंनद घेऊ शकतो
– अंग्रिया क्रूज ही भारतातील पहिली डाेमेस्टिक लग्जरी क्रूज सर्विस देणारी पहिली कंपनी आहे. मागच्या वर्षी मुंबई ते गोवा यादरम्यान क्रूझ सेवा सुरु करण्यात आली आहे. या क्रूझ मध्ये एक अंडर वॉटर स्पा आहे तसेच जिम आणि स्विमिंग पूल यांसोबत २ रेस्टॉरंट, ६ बार आणि ३ ओपन डेक आहेत. आंग्रीया क्रूझचा मजा घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला ७ हजार खर्च येईल. कपल रूम साठी सर्वात जास्त म्हणजे १० हजार शुल्क आहेत. हे क्रूझ दररोज सकाळी ५ वाजता मुंबई हुन निघण्याची निघते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता गोव्याला पोहचते.

– कॉस्टा क्रूझ भारत हे भारतातील पश्चिमी तटावरून ३ ते ७ दिवसांची क्रूझ यात्रा करत असते. मुंबई मधून सुरु होणारी ही यात्रा चार रात्रीमध्ये तुम्हाला कोची पर्यंत घेऊन जाईल . पुढच्या ३ रात्रींमध्ये हे मालदीवची राजधानी माले पर्यंत पोचवते.

– एमवि परमहंस वर विवाडा क्रूझ – सुंदरबनच्या जंगलांमधील मॅन्ग्रूव्ह ची झाडे जगातील सर्वात मोठी इकोसिस्टम आहे. या विवाडा क्रूझ वर तुम्ही चार दिवसांचा आनंद घेऊ शकतो. हे क्रूझ सुंदरबन टायगर रिजर्व च्या जंगलांमधून जाते. य क्रूझ वर ४ दिवस आणि ३ रात्रीसाठी दोन जेष्ठ लोक आणि १ लहान मुलगा यांच्यासाठी ४८,५०० रुपये आणि ९,००० रुपये खर्च येईल.

– हे क्रूझ तुम्हाला उत्तर – पूर्व भारतातील लोकप्रिय ठिकाणांचे दर्शन करवते. या क्रूझ वर २ रात्रीपासून ७ रात्रीपर्यंत यात्रा करता येऊ शकते. ज्यासाठी वेगवेगळे पॅकेज उपलब्ध आहेत. या क्रूज चे मुख्य आकर्षण काजिरंगा नॅशनल पार्क आणि पिकॉक आइलैंड हे आहे.

– ओबेरॉय मोटर वेसल वृंदा क्रूझ – या क्रूझ च्या माध्यमातून तुम्ही केरळ च्या टूर चा आनंद घेऊ शकतो. हे पंचतारांकित क्रूझ आहे. हे क्रूझ अल्लेपी च्या निर्मळ पाण्याचा वेगळा अनुभव देईल. याशिवाय इथे कथकली आणि मोहिनी उत्तम चा आनंद सुद्धा घेऊ शकतो.

आरोग्यविषयक वृत्त –