खुशखबर ! डाळीवर 15 रुपयांपर्यंत सूट देईल सरकार, स्वस्त दरात करणार विक्री

नवी दिल्ली : महाग झालेली डाळ लवकरच तुमच्या ताटात स्वस्त होऊन पोहचणार आहे. कारण, डाळीच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार ओपन मार्केट सेल स्कीममध्ये डिस्काऊंट देऊ शकते. सूत्रांनुसार, प्राइस मॉनिटरिंग कमेटीने प्रति किलो 10 ते 15 रुपये सूट देण्याची शिफारस केली आहे. सूत्रांनुसार, ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत डाळीवर सूट मिळेल. नाफेड ओपन मार्केट स्कीममध्ये डाळीचा लिलाव करते.

15 रुपये प्रति किलोपर्यंत मिळेल सूट
यामध्ये प्राईस मॉनिटरिंग कमिटीने सूट देण्याची शिफारस केली आहे. डाळीवर 10 ते 15 रुपये प्रति किलोची सूट मिळू शकते. यासाठी सरकारने 20 लाख टन डाळीचा बफर स्टॉक केला आहे. सणांच्या काळात डाळींच्या किमतींमध्ये वाढ झाली होती.

सरकारने उचललेल्या पावलांचा परिणाम
सणाच्या काळात अ‍ॅग्री कमोडिटी, विशेषकरून खाद्यतेले आणि डाळींच्या भावात प्रचंड वाढ दिसून आली, परंतु आता सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केल्याने वाढणारे भाव कमी होण्याची चिन्हे आहेत. सोबतच रब्बीच्या चांगल्या पेरणीचाही परिणाम भावावर पडत आहे. मात्र, कॉटनसह अनेक कमोडिटीमध्ये अजूनही मजबूती दिसून येत आहे.

तसेच सीपीओच्या ड्यूटीमध्ये कपात होणार आहे. सरकारने क्रूड पाम ऑईलवर ड्यूटी कमी केली आहे. सीपीओवर ड्यूटी 37.5 टक्क्यांवरून 27.5 टक्के केली आहे. वाढत्या किमतींमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. एकुण मागणीत पामतेलाचा 40 टक्के वाटा आहे.

You might also like