घर मालकांसाठी चांगली बातमी, आता घर भाड्याने देण्याची भीती राहणार नाही, जाणून घ्या

लखनऊ : वृत्तसंस्था – देशातील एक कोटीपेक्षा जास्त लोकांकडे घरे आहेत पण ते आपली घरे भाड्याने देण्यास घाबरत आहेत. म्हणूनच केंद्र सरकार ‘भाडे नियंत्रण कायदा’ तयार करत आहे. यामुळे घर भाड्याने देणे सोपे होईल, असे गृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले. कृषीनंतर रिअल इस्टेट हा रोजगार निर्मितीत सर्वोत्तम क्षेत्र असल्याचेही त्यांनी सांगितले. इंदिरा गांधी फाऊंडेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या रेराच्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना ते बोलत होते.

राज्यांनी भाडे नियंत्रण कायदा लागू केल्यावर भाडेकरूमधील असलेले वाद संपतील आणि लोक घरे भाड्याने देऊ शकतील. त्यामुळे लोकांच्या घरांच्या समस्या देखील दूर होतील. वास्तविक राज्याच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकार ई-कॉमर्स पोर्टलही तयार करणार असल्याचे हरदीपसिंग पुरी यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना हरदीप सिंग पुरी म्हणाले, पंतप्रधान फ्लॅगशिप योजनेत उत्तर प्रदेश एक चांगले काम करत आहे. देशभरात रेराची जवळपास 45000 प्रकरणे आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशची परिस्थिती अधिक चांगली आहे. यूपीमध्ये 1200 प्रकरणे निकाली निघाली आहेत. मेट्रो रेल्वे प्रकल्प क्षेत्रात चांगले काम केले जात आहे. यावेळी उदाहरण देताना सांगितले की, जून 2015 ते मार्च 2017 या कालावधीत केवळ 22 किलो मीटरच्या प्रकल्पांना मंजूरी मिळाली होती. परंतु एप्रिल 2017 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत 72.76 किलो मीटरच्या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास