मोदी सरकार ‘तेजस’नंतर आता 150 रेल्वे गाड्या आणि 50 स्टेशनचं खासगीकरण करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने देशाच्या रेल्वे स्थानकांचे आणि रेल्वेचे खासगीकरण करण्याचा वेग वाढवला आहे. देशाची पहिली खाजगी सेमी हायस्पीड ट्रेन तेजसला पहिली कॉरपोरेट रेल्वे बनवल्यानंतर आता भारतीय रेल्वे 50 रेल्वे स्थानकांवर 150 रेल्वे गाड्यांचे खाजगीकरण करण्याच्या तयारीत आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांना याबाबत पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये रेल्वे गाड्यांचे खाजगीकरण करण्यासंदर्भात उल्लेख केलेला आहे.

400 रेल्वे स्थानकांना वर्ल्ड क्लास बनवण्याचा निर्धार
अमिताभ कांत यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, रेल्वे मंत्रालयाने खाजगी ट्रेन ऑपरेटर्सला आणण्याचा निर्णय घेतला आहे आणि पहिल्या टप्प्यात 150 रेल्वे गाड्यांचा यामध्ये समावेश करणार आहेत. नीती आयोगाच्या या पत्रात 400 रेल्वे स्थानकांना वर्ल्ड क्लास बनवण्याचा देखील प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले आहे.

इंपावर्ड ग्रुप ऑफ सेक्रेट्रीज बाबत विचार करण्याचा दिला सल्ला
पत्रात कांत यांनी सहा एयरपोर्टच्या खाजगीकरणाबाबत देखील उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की या प्रकारचे काम रेल्वेसाठी सुद्धा केले जाऊ शकते. यासाठी त्यांनी इंपावर्ड ग्रुप ऑफ सेक्रेट्रीज बाबत सल्ला दिला आहे. तसेच रेल्वे संबंधित महत्वाच्या नीती आयोगाचे सीईओ चेअरमन रेल्वे बोर्ड, सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक अफेयर्स, सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग आणि अर्बन अफेयर्स यांचा समावेश करून निर्धारित वेळेत काम पूर्ण कारण्याच्यासाठी पावले उचलावीत असे म्हटले आहे.

मेक माय ट्रिप, इंडिगो आणि स्पाईसजेटने दाखवली रुची
मेक माई‍ ट्रिप, इंडिगो आणि स्‍पाइसजेटनी दाखवलेली रुची तेजसबाबतही अनेक मोठ्या कंपन्या दाखवत आहेत. मेक माय ट्रीपने यासाठी भारतीय रेल्वेला एक प्रपोजल पाठवले आहे. त्याचप्रमाणे प्रमुख विमान कंपन्या इंडिगो आणि स्पाईसजेट ने सुद्धा भारतीय रेल्वेला प्रपोजल पाठवून खाजगी रेल्वे चालवण्यासाठी रुची दाखवली आहे.

visit : policenama.com 

You might also like