ज्येष्ठ नागरिकांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट, एअर इंडियाच्या विमानात ‘हाफ तिकिट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने (Central Government) विमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) मोठं गिफ्ट दिलं आहे. देशातील 60 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एअर इंडियाचं (Air India) तिकिट अर्ध्या दरात (Half Ticket) उपलब्ध होणार आहे. याबाबत बुधवारी केंद्र सरकारने माहिती दिली. या संदर्भात एअर इंडियाच्या वेबसाईटवर याची माहिती दिलेली आहे. मात्र, यासाठी काही अटी असणार आहेत.

योजनेतील अटी
– प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाकडे भारतीय नागरिकत्व पाहिजे. भारतात स्थायिक असलेल्या, भारतात राहणारे ज्येष्ठ नागरिक ज्याचे वय 60 वर्षे पूर्ण असले पाहिजे.
– ईकॉनॉमी केबिनमध्ये बुकिंग श्रेणीच्या मूळ भाड्याचे 50 टक्के
– भारतात कोणत्याही सेक्टरमध्ये प्रवासासाठी लागू
– तिकिट जारी केलेच्या 1 वर्ष मुदतीसाठी लागू
– प्रवासाच्या सात दिवस आधी बुकिंग करावे लागेल

एअर इंडियाकडून याआधीही अशा प्रकारची योजना सुरु केली होती. आता याला केंद्र सरकारकडून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. सध्या एअर इंडियाला खासगी कंपनीकडे देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये पुन्हा एकदा टाटा कंपनी एअर इंडिया चालवण्यासाठी घेऊ शकते असे वृत्त समोर येत आहे.

53 वर्षानंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडे येणार
उद्योग क्षेत्रातील देशातील विश्वसनीय टाटा समूहाने (TATA) संकटात असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (Air India) खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी टाटा समूहाने मागील आठवड्यातच प्रस्ताव (Expression of Interest) दिला आहे. ही डील पक्की झाली तर एअर इंडियाची 53 वर्षानंतर घरवापसी होईल. ही कंपनी 88 वर्षापूर्वी जेआरडी टाटा यांनी स्थापन केली होती. टाटाने यासाठी एअर एशियाचा उपयोग केल्याचे बोलले जात आहे. यात टाटा सन्सची हिस्सेदारी आहे.