Covid-19 : व्हॅक्सीनच्या कमतरतेच्या तक्रारी येत असताना केंद्राने जारी केला डाटा, सांगितले कुणाकडे किती डोस

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी म्हटले की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे कोविड-19 विरोधी लसीचे एक कोटीपेक्षा जास्त डोस उपलब्ध आहेत आणि पुढील तीन दिवसात आणखी 57,70,000 डोस त्यांना मिळतील. मंत्रालयाने म्हटले की, केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना 15,95,96,140 डोस निशुल्क उपलब्ध करून दिले. यापैकी खराब होणारे डोस अधिक इतर असे एकुण 14,89,76,248 डोस वापरले गेले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जारी केले आकडे
मंत्रालयाद्वारे जारी आकड्यांनुसार राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडे कोरोनाचे आणखी 1,06,19,892 डोस उपलब्ध आहेत. सरकारी वक्तव्यानुसार, राज्य, केंद्रशासित प्रदेशांना पुढील तीन दिवसात 57 लाखांपेक्षा जास्त डोस मिळतील.

मंत्रालयाने म्हटले की, महाराष्ट्र सरकारच्या काही अधिकार्‍यांच्या संदर्भाने मीडियातील काही बातम्यांमध्ये सांगण्यात आले की, राज्यात डोस संपले आहेत, ज्यामुळे राज्यात लसीकरण अभियानावर प्रतिकुल परिणाम होत आहे.

मंत्रालयाने म्हटले, हे स्पष्ट केले जात आहे की, महाराष्ट्राला 28 एप्रिल सकाळी आठ वाजेपर्यंत कोरोनाचे 1,58,62,470 डोस देण्यात आले. यापैकी खराब (0.22 टक्के) होणार्‍या डोससह 1,53,56,151 डोस वापरले गेले आहेत. राज्याकडे अजूनही 5,06,319 डोस उपलब्ध आहेत. तर महाराष्ट्राला पुढील तीन दिवसात आणखी 5,00,000 डोस पाठवले जातील. मंगळवारी 4 बिगर भाजपा शासित राज्यांनी डोसच्या कमतरतेमुळे 1 मेपासून लसीकरण करण्यास नकार दिला होता. केंद्राने भाजपाशासित राज्यांपैकी युपीची आकडेवारी दिली असून सर्वात जास्त डोस युपीला देण्यात आले आहेत, मात्र यामध्ये गुजरातची आकडेवारी नाही.