Central Home Minister Medal | पुणे ग्रामीण पोलीस दलातील तीन तपासी अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्ह्यांचा तपास उत्कृष्टरित्या (Excellent Investigation) करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील (Pune Rural Police) तीन अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ (Central Home Minister Medal) जाहीर करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक दिलीप पवार (Police Inspector Dilip Pawar), पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत (Police Inspector Suresh Kumar Raut) व सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार (Assistant Police Inspector Manoj Pawar) या तीन तपास अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ (Central Home Minister Medal) जाहीर झाले आहे.

 

केंद्र सरकारच्या (Central Government) गृह विभागाकडून (Home Department) दरवर्षी गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ (Central Home Minister Medal) दरवर्षी दिले जाते. याकरिता महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलास एकूण 11 पदके प्रदान केली जातात. पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून क्लिष्ट आणि अतिशय गंभीर गुन्ह्याचा तपास करणाऱ्या 4 तपास अधिकारी यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला होता. त्यापैकी तीन तपासी अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे.

पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे लोणावळा शहर (Lonavala City Police Station) येथे प्रभारी अधिकारी असताना दरोड्याच्या (Robbery) गुन्ह्यात मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय टोळी असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हा आरोपींना मध्यप्रदेशमधून अटक (Arrest) करण्यात आली होती. गुन्ह्यात घडल्याच्या तारखेपासून अहोरात्र तपास करुन त्यांनी 10 दिवसांच्या आत गुन्ह्याची उकल केली. पवार यांच्या पथकाने एकूण 15 आरोपींना अटक करुन गुन्ह्यातील 30 लाख 52 हजार 200 रुपये किंमतीचा रोख रक्कम आणि मुद्देमाल जप्त केला.

 

पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे शिरुर (Shirur Police Station) येथे प्रभारी होते. तेव्हा बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपरखेड (Bank of Maharashtra, Pimperkhed) या ठिकाणी बँकेचे कर्मचारी व हजर ग्राहकांना पिस्तुलाचा (Pistol) धाक दाखवून एकूण 824 तोळे सोने-चांदीचे दागिने (Gold and Silver Jewellery) व रोख रक्कम (Cash) असा 32 लाख 52 हजार 560 रुपयांचा ऐवज आरोपींनी लुटून नेला होता. हा गुन्हा उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. या गुन्ह्याचा शिरूर पोलीस स्टेसन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (Local Crime Investigation Branch) समांतर तपास करुन 2 कोटी 36 लाख 42 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 5 आरोपींना अटक केली.

सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे वेल्हा (Velha Police Station) येथे प्रभारी अधिकारी असताना
कातकरी समाजाची एक लहान मुलगी हरविल्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला होता. मुलगी मयत स्थितीत आढळून आली होती.
या मुलीच्या शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) होऊन ती मयत झाल्याचा अहवाल दिला होता.
या गुन्ह्यात पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) वाढीव कलम लावण्यात आले होते.
सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला 48 तासांत अटक केली.
हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात आला
आणि या गुन्ह्यात आरोपीला 28 फेब्रुवारी रोजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावण्यात आली.

 

क्लिष्ट आणि अतिशय गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte),
अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते (Addl SP Baramati Division Milind Mohite),
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.
केंद्रीय गृह विभागाकडून उत्कृष्ट तपासाकरीता ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ 2022 जाहीर झाल्याने
सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

Web Title :- Central Home Minister Medal | Central Home Minister Medal to 3 Investigating Officers of Pune Rural Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा