पुणे मेट्रोचा 12 KM पर्यंतचा मार्ग मार्चपर्यंत पुर्ण होईल; प्रकाश जावडेकर यांनी दिली माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील बारा किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम मार्च पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय पर्यावरण आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

पुणे जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीची बैठक जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) झाली. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प, मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आणि माध्यान्य भोजन योजना आढावा बैठकीत घेण्यात आला. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे मार्गाची पायाभरणी पुढील महिन्यात केली जाईल असे जावडेकर यांनी बैठकीत सांगितले.

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प म्हणजे केंद्र सरकारने पुण्याला दिलेलं ‘गिफ्ट’ आहे. ह्या प्रकल्पाला गती दिली जाईल, याकरिता राज्यस्तरावर बैठकांचे आयोजन केले जाईल अशीही माहिती जावडेकर यांनी दिली.