महिलांमध्ये वाद झाल्याने ‘तिने’ घेतला ‘पोलीसा’च्या हाताचा ‘चावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई लोकलमध्ये होणारे वाद काही नवे नाहीत परंतू नुकत्याच झालेला वाद हा जरा वेगळाच आहे. हा वाद जरी बसण्याच्या जागेवरुन झाला असला तरी, या वादात एका महिलेने थेट दुसऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेतला. फर्स्ट क्लासमध्ये बसल्याच्या वादावरुन रेल्वे कर्मचारी महिलेने महिला पोलिसांच्या हातावर चावा घेतल्याचा प्रकार घडला. प्रियंका मोरे असे या महिलेचे नाव आहे. ही महिला मध्य रेल्वेची कर्मचारी आहे. या कारणाने या महिलेला अटक करण्यात आली. मंगळवारी पोलीस कॉन्टेबल वर्षा गायकवाड यांच्यात आणि प्रियंका मोरे यांच्या वाद झाला होता.

काय झाला वाद –

वडाळा येथून सीएसटीकडे सुटणारी रेल्वे वर्षा गायकवाड यांनी कुर्लावरून पकडली, त्यादिवशी चुनाभट्टी या ठिकाणी त्यांची ड्युटी होती. गायकवाड या महिला प्रथम वर्गाच्या डब्यात गेल्या. त्याचं डब्यात प्रियंका मोरे होत्या. त्यावेळी मोरें यांच्याशी गायकवाड यांचा वाद झाला. तुम्ही गणवेशात असून देखील फर्स्ट क्लासमध्ये कसे प्रवास करतात असा प्रश्न विचारुन वाद घालण्यात मोरेंनी सुरुवात केली. त्यानंतर तुम्ही का बोलत नाहीत असे म्हणत इतर प्रवाशांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी प्रियंका मोरे यांनी पोलीस स्टेशनला चला असे सांगितले.

लोकल जेव्हा जीटीबी नगर येथे पोहचली तेव्हा वर्षा गायकवाड यांनी प्रियंका मोरे यांना उतरण्यास सांगत पोलीस स्टेशनला चला असे सांगितले, यावेळी प्रियंका मोरे यांनी गायकवाड यांच्या हाताला चावा घेतला. याप्रकरणी मोरे यांना अटक करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

तणावामुळे जुनी दुखणी होतात अधिक गुंतागुतीची

फॅमिली प्लनिंगसाठी हे ‘ वय ‘ योग्य

हाडांमधून वारंवार आवाज येणे हे भविष्यातील समस्यांचे लक्षण

पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय

मनशांतीसाठी सहज करता येतील ‘हे’ सोपे आणि घरगुती उपाय

सिनेजगत

‘या’ ५ सिनेमांवरून झाला प्रचंड ‘राडा’ ; परंतु, बॉक्स ऑफिसवर ‘छप्परफाड’

Video : ‘बेबी डॉल’ सनी लिओनीवर झाडली ‘गोळी’, सनी कोसळली ; पुढे झाले ‘असे’ काही