Central Railway Megablock | ठाणे ते दिवा दरम्यान 36 तासांचा मेगाब्लॉक; ठाणे ते कल्याण दरम्यान एकही ‘लोकल’ ट्रेन धावणार नाही, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Central Railway Megablock | ठाणे आणि दिवा (Thane to Diva) दरम्यान 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेचं काम मध्य रेल्वे (Central Railway) आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीने (Mumbai Railway Development Corporation) करण्यात येत आहे. या कारणामुळे ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक (Central Railway Megablock) घेण्यात आला आहे. हा ब्लॉक 8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान सुरु राहणार आहे. आज (शनिवारी) दुपारी 2 वाजल्यापासून ब्लॉक सुरु होईल. तो ब्लॉक सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरु राहील, याबाबत माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

8, 9 आणि 10 जानेवारी रोजी 36 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते दिवा (Thane to Diva) दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिका साठी मध्य रेल्वेकडून युद्ध पातळीवर काम सुरू असल्याने मध्य रेल्वेनं जाहीर केलेल्या 36 तासांच्या ब्लॉकमध्ये ठाणे ते कल्याण दरम्यान एकही लोकल ट्रेन धावणार नाही. या मार्गिकेवरील जलद लोकल सेवा मात्र सुरु असणार आहे. (Central Railway Megablock )

या मेगाब्लॉकदरम्यान मुंबई ते कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापूरच्या दिशेने धावणाऱ्या सर्व अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्या या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून न धावता जलद मार्गावर धावणार आहेत. त्याचबरोबर काही मेल एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. 10 जानेवारी रोजी सकाळपासून अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल गाड्या या नेहमीच्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत. रद्द झालेल्या गाड्यांची संपूर्ण माहिती https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत रेल्वेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Web Title : Central Railway Megablock | 36 hour megablock between Thane and Diva; No local train will run between Thane and Kalyan, but …

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय