नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य रेल्वे, रेल्वे भरती सेलने अप्रेंटिसच्या पदासाठी एक भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. 6 फेब्रुवारी 2021 पासून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार सेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती 5 मार्च 2021 च्या अगोदर सायंकाळी 5 वाजेपर्यंत आरआरसीची अधिकृत वेबसाइट – rrccr.com वर अर्ज करू शकतात.
रिक्त पदांची माहिती :
मुंबई, भुसावळ, पुणे, नागपुर आणि सोलापुरसह विविध ठिकाणे जसे की, कॅरेज अँड वॅगन, मुंबई कल्याण डिझेल शेड, परेल वर्कशॉप, मनमाड वर्कशॉप इत्यादी अतंर्गत एकुण 2532 जागा उपलब्ध आहेत.
मुंबई
कॅरेज अँड वॅगन (कोचिंग) वाडी बंडर – 258 पोस्ट
मुंबई कल्याण डिझेल शेड – 53 पदे
कुर्ला डिझेल शेड – 60 पदे
सीनियर डी.ई.ई (टीआरएस) कल्याण – 179 पदे
सीनियर डीईआरई (टीआरएस) कुर्ला – 192 पदे
परेल वर्कशॉप – 418 पदे
माटुंगा कार्यशाळा – 547 पदे
एस अँड टी कार्यशाळा, भायखळा – 60 पदे
भुसावळ
कॅरेज अँड वॅगन डेपो – 122 पोस्ट
इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ – 80 पोस्ट
इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह वर्कशॉप – 118 पोस्ट
मनमाड वर्कशॉप – 51 पदे
टीएमडब्ल्यू नाशिक रोड – 49 पोस्ट
पुणे
कॅरेज आणि वॅगन डेपो – 31 पदे
डिझेल लोको शेड – 121 पोस्ट
नागपुर
इलेक्ट्रिक लोको शेड – 48 पदे
अजनी कॅरेज अँड वॅगन डेपो – 66 पोस्ट
सोलापुर
कॅरेज आणि वॅगन डेपो – 58 पोस्ट
कुर्दुवाड़ी कार्यशाळा – 21 पदे
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त संस्थेतून 10 वी इयत्ता परीक्षा किंवा तिच्या समकक्ष (10 + 2 परीक्षा प्रणालीमध्ये) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असावा. नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगद्वारे जारी संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा व्होकेशनल ट्रेनिंगसाठी नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग / स्टेट कौन्सिलद्वारे जारी करण्यात आलेले सर्टिफिकेट असावे. शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी ऑफिशियल नोटिफिकेशन पहावे.
निवड प्रकिया :
रेल्वेद्वारे जारी नोटिफिकेशननुसार, उमेदवारांची निवड मॅट्रिक यादीत गुणांच्या टक्केवारीच्या अधारावर तयार केली जाईल (किमान 50% एकुण गुणांसह) + ट्रेडमध्ये आयटीआय गुण ज्यामध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 6 फेब्रुवारीपासून 5 मार्च 2021 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन मोडच्या माध्यमातून सेंट्रल रेल्वे भरती 2021 साठी अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज जमा करताना, प्रत्येक अर्जदाराला नोंदणी क्रमांक जारी केला जाईल. उमेदवारांना सल्ला देण्यात येत आहे की, त्यांनी पत्रव्यवहाराच्या पुढील टप्प्यासाठी आपला नोंदणी क्रमांक सुरक्षित ठिकाणी नोंद करून ठेवावा.