Central Railway Recruitment 2021 : परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी, 2532 जागांसाठी निघाली भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेसोबत ट्रेंड अप्रेन्टिस पदावर काम करू इच्छिणाऱ्यांसाठी मध्य रेल्वे चांगली संधी देत आहे. मध्ये रेल्वे रिक्रूटमेंट सेलने 2532पदांवर अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार 6 फेब्रुवारी 2021 पासून ट्रेंड अप्रेन्टिस पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, जी 5 मार्च 2021 पर्यंत चालेल. या पदासाठी इच्छुक उमेदवार www.rrccr.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे मुंबई, भुसावळ, पुणे नागपूर आणि सोलापूरसोबतच इतर भागातील जागा भरण्यात येणार आहे.

शैक्षिणक पात्रता
या पदासाठी उमेदवारास मान्यता प्राप्त बोर्डाकडून किमान 50% गुणांसह दहावीची आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

वय :
अर्जदाराचे वय किमान 15 ते जास्तीत जास्त 24 वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती / जमातीच्या उमेदवारांच्या बाबतीत वयाची मर्यादा पाच वर्षे आणि ओबीसी उमेदवारांच्या बाबतीत तीन वर्षांची मर्यादा देण्यात आली आहे.

अर्जाचे शुल्क :
– अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल.
– आपण डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंग / एसबीआय चालान इत्यादीद्वारे ऑनलाईन शुल्क भरू शकता.
– अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी / महिला उमेदवारांसाठी अर्ज भरणे विनामूल्य आहे.

निवड प्रक्रिया
रेल्वेमध्ये अ‍ॅप्रेंटिसच्या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत देण्याची गरज नाही, तर गुणवत्ता दहावीच्या आधारे दिली जाईल. त्याद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.