Central Railway Recruitment 2022 | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदांसाठी होतेय भरती, जाणून अर्ज करण्याची पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Central Railway Recruitment 2022 | रेल्वेमध्ये नोकरी (Railway Job) करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाने (Central Railway Board) कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Junior Technical Assistant Post) पदासाठी 20 रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरुन इच्छुक उमेदवार अर्ज (Application) करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मार्च 2022 आहे.

 

उमेदवाराचे वय
उमेदवाराची वयोमर्यादा (Age Limit) अनारक्षित प्रवर्गासाठी 18 ते 33 वर्षे, OBC प्रवर्गासाठी 18 ते 36 वर्षे आणि SC/ST प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे आहे. (Central Railway Recruitment 2022)

 

शैक्षणिक पात्रता
संबंधित उमेदवाराकडे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये चार वर्षांची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठी/संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमधील (Civil Engineering) तीन वर्षाचा डिप्लोमा (Diploma) किंवा तीन वर्षांच्या कालावधीच्या स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये B.Sc चे संजोजन असणे आवश्यक आहे.

 

पगार
उमेदवारांना 25 हजार रुपयांपासून ते 30 हजार रुपयापर्यंतच्या वेतनाची तरतूद करण्यात आली आहे.

अशी होईल निवड
उमेदवार त्यांची पात्रता, अनुभव व व्यक्तिमत्त्व या आधारे निवड केली जाईल.

 

अर्जाचे शुल्क
SC/ST/OBC/महिला/अल्पसंख्याक/EWS उमेदवारांसाठी अर्ज फी 250 रुपये आहे. इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी 500 रुपये आहे.

 

अर्ज कसा करायचा ?
मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट cr.indianrailways.gov.in वर भेट द्या.
होम पेजवर ‘कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक’च्या कराराच्या आधारावर रिक्त जागा निवडा. अधिसूचनेमध्ये अर्जाचा फॉर्म देण्यात आला आहे. तो तपशीलवार वाचा आणि अर्ज भरा.

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता
उपप्रमुख कार्मिक अधिकारी (बांधकाम), मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कार्यालय (बांधकाम), नवीन प्रशासकीय इमारत, 6 वा मजला, अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डीएन रोड, मध्य रेल्वे, मुंबई CSMT, महाराष्ट्र – 400001

 

Web Title :- Central Railway Recruitment 2022 | central railway recruitment 2022 apply for various posts engineering and diploma can apply last date 14 march 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा