रेल्वेत नोकरी करण्याची संधी, मध्य रेल्वेत ‘शिक्षक’ पदांची भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वेत नोकरी करायची असेल तर उत्तम संधी आली आहे. मध्य रेल्वेनं व्हेकन्सी काढली आहे. ही व्हेकन्सी शिक्षक पदासाठी असून ही पदं PGT, TGT आणि PRT आहेत. एकूण 15 जागा असून या पदासाठी तुम्ही मुलाखतीसाठी थेट येऊ शकता.

पद आणि संख्या
PGT – 5 , TGT (सायन्स) – 1, PRT (आर्टस्)- 5, PRT – 4

शैक्षणिक पात्रता
PGT – पदव्युत्तर, M.Sc. किंवा 50 % गुणांसहित मास्टर डिग्री, बीएड
TGT – पदवीधर, बीएड, PRT – 50 % गुणांसह 10वी उत्तीर्ण, पदवीधर, B.A., B.Sc. डिप्लोमा

वय
18 ते 65 वर्षापर्य़ंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. नोकरी करण्याचे ठिकाण हे भुसावळ असणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून, उमेदवारांनी त्यांचे अर्ज घेऊन 14 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. उमेदवारांची मुलाखत मध्य रेल्वेच्या भुसावळ कार्यालयात घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://cr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

आरोग्यविषयक वृत्त –