Pune News : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुणे-दौंड शटल सेवा सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे-दौंड शटल सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ पुणे-दौंड दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी शटल सेवा सुरु करण्याचा निर्णय मध्य रेल्वे घेतला असून शटलच्या चार फेऱ्या होणार आहेत.

ऑनलाइन प्रक्रियेत राज्य सरकारने 5 नोव्हेंबर 2020 रोजी पुणे-दौंड मार्गावरील डेमू सेवेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा दिली होती. त्यासाठी स्थानिक पोलिस आयुक्तांना नोडल ऑफिसर म्हणून नेमले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर डेमू सेवा सुरु करण्याचा निर्णय झाला. परंतु, सेवा सुरु होण्यापुर्वीच हा निर्णय रद्द करण्यात आला.

पुणे-दौंड शटल सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटना आणि स्थानिक प्रतिनिधींनी मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर पुणे-दौंड डेमूदेखील तातडीने सुरु करावी, अशी मागणी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाने मध्य रेल्वे प्रशासनाकडून नुकतीच केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष शटल सेवा सुरु केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पुणे पोलिसांकडून ‘क्युआर कोड’ आधारित पास घेणे आवश्यक आहे. पुणे पोलिसांच्या वेबसाईटवरून प्रक्रिया पूर्ण करता येणार असून प्रवासादरम्यान ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे.

पुणे-दौंड शटल सेवा

01489 सकाळी 7.05 वाजता सकाळी पुण्याहून सुटेल आणि सकाळी 8.50 वाजता दौंडला पोहचेल

01489 सायंकाळी 6.45 वाजता सुटेल रात्री 8.30 वाजता पोहचेल

दौंड – पुणे शटल सेवा

01490 सकाळी 7.05 वाजता दौंड येथून सुटेल आणि 8.50 वाजता पुणे येथे पोहचले.

01492 सायंकाळी 6.15 वाजता सुटेल सायंकाळी 7.55 पोहचेल