Central Universities CET | UGC ची मोठी घोषणा ! केंद्रीय विद्यापीठांमधील सीईटी परीक्षा रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Central Universities CET | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय विद्यापीठांतील प्रवेश घेण्यासाठीची सामान्य प्रवेश परीक्षा यूजीसीकडून रद्द करण्याची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. शैक्षिणक वर्ष 2021-22 मध्ये आता UGC च्या निर्णयानुसार केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सामान्य प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) घेतली जाणार नाही. यावरून आता विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला आहे. याबाबत माहिती UGC ने ट्विटद्वारे दिली आहे.

केंद्रीय विद्यापीठांतील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी प्रस्तावित केंद्रीय विद्यापीठ सामान्य प्रवेश परीक्षा (CUCET 2021) यंदाच्या शैक्षणिक सत्राच्या 2021-22 पासून लागू केली जाणार नाही. तर यावर्षीही सर्व केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेश प्रक्रिया जुन्या नियमांनुसार घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, केंद्रीय विद्यापीठ सामान्य प्रवेश परीक्षा (CUCET) अर्थात प्रवेश परीक्षा आगामी शैक्षणिक सत्रापासून म्हणजेच 2022-23 पासून घेतली जाईल, असं देखील UGC ने ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याआधी केंद्रीय विद्यापीठांत प्रवेश हे प्रवेश परीक्षेच्या आधारे होतील असे
म्हटलं होतं. परंतु, कोरोनामुळं प्रवेशासाठीची CET रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण
मंत्रालयाने राष्ट्रीय धोरण विषयक धोरण (NEP-2020 ) अंतर्गत केंद्रीय विद्यापीठांतील सर्व पदवी
अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (CUCET) च्या कार्यपद्धती तपासण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती.

हे देखील वाचा

Kareena Kapoor | ‘तू मुलाला विकू शकत नाही’; तैमूरसाठी सैफ अली खानला असं काय बोलली करिना कपूर (Video)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Central Universities CET | ugc declared cucet 2021 cancelled for this academic year due to corona admission in central university done with old method

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update