50 कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या घोटाळयाची चौकशी आता ‘या’ बोर्डाकडे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय दक्षता आयोगाने ५० कोटी रुपयांपेक्षा मोठा घोटाळा केलेल्या बँकांची चौकशी करण्यासाठी नवीन बोर्डाची स्थापना केली आहे. या बोर्डाला ‘एडवायजरी बोर्ड फॉर बँक फ्रॉड्स’ असे नाव देण्यात आले असून माजी दक्षता आयोग अध्यक्ष टी.एम. भसीन यांना या बोर्डाचे प्रमुख करण्यात आले आहे. हा बोर्ड चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची शिफारस करणार आहे.

आरबीआयच्या मार्गदर्शनानुसार स्थापना
या बोर्डाच्या वतीने रविवारी जारी करण्यात आलेल्या पत्रकात सांगितले कि, या बोर्डाची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार स्थापन करण्यात आली आहे. मोठ्या घोटाळ्यांची चौकशी या बोर्डामार्फत करण्यात येणार आहे. हा चार सदस्यीय बोर्ड बँकेच्या जनरल मॅनेजर सारख्या मोठ्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या घोटाळ्यांची चौकशी करणार आहे. या बोर्डाच्या चौकशींनंतर त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अन्य काही तांत्रिक अडचण आल्यास हे बोर्ड प्रकरण सीबीआयकडे देखील सोपवू शकते.

हे आहेत बोर्डाचे सदस्य
दक्षता आयोगाचे माजी आयुक्त टी.एम. भसीन यांच्याबरोबरच माजी शहर सचिव मधुसूदन प्रसाद, बीएसएफचे माजी डीजी डीके पाठक, आंध्रा बँकेचे माजी एमडी-सीईओ सुरेश एन पटेल यांचा या मध्ये समावेश आहे. या सर्व सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा राहणार असून २१ ऑगस्ट २०१९ पासून या बोर्डाची सुरुवात झाली आहे. हे बोर्ड वेळोवेळी होणाऱ्या घोटाळ्यांची चौकशी करणार असून हे घोटाळे रोखण्यासाठी आरबीआयला कायदे करण्यास मदत करणार आहे. आरबीआयच्या दिल्लीतील मुख्य सचिवालयातून याचा कारभार चालणार असून सर्व प्रकारच्या केंद्रीय सेवांचा लाभ दिला जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या