Coronavirus : महाराष्ट्रासाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, उद्धव ठाकरे यांनी मानले PM मोदींचे आभार

मुंबई : कोरोना व्हायरसने सर्वाधिक उध्वस्त झालेल्या महाराष्ट्राच्या मदतीसाठी केंद्र सरकारने रेमडेसिविरच्या सप्लायसाठी मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रेमडेसिविरच्या 4.35 लाख वायल (छोट्या बाटल्या) साठी मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर शनिवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि त्यांना धन्यवाद दिले. कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी पूर्ण देशात वाढली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी म्हटले की, राज्याला 21 ते 30 एप्रिलच्या कालावधीत केंद्राकडून रेमडेसिविरच्या 4.35 लाख वायल मिळतील. पुरवठ्यात वाढ करण्याची मागणी स्वीकारल्याने उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. मुख्यमंत्री म्हणाले, सध्याचा पुरवठा 2.69 लाख वायल होता, जो वाढवून 4.35 लाख वायल करण्यात आला आहे. त्यांनी म्हटले की, राज्य सरकारला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत एक पत्र मिळाले आहे.

यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या एका निर्णयानंतर धन्यवाद दिले होते. केंद्र सरकारने जेव्हा भारत बायोटेकची कोरोना व्हायरस व्हॅक्सीन कोव्हॅक्सीनच्या उत्पादनासाठी मुंबईतील हाफकिन इन्स्टीट्यूटला आपली परवानगी दिली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) अधिकार्‍याने म्हटले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला विनंती केली आहे की, केंद्राने हाफकिन इन्स्टीट्यूटला कोव्हॅक्सीनच्या उत्पादनाची परवानगी दिली. सध्या या लसीची निर्मिती हैद्राबाद येथील भारत बायोटेकद्वारे केली जात आहे. त्यांनी म्हटले की, यासाठी केंद्राने आपली मंजूरी दिली आहे. अधिकार्‍याने सांगितले की, ठाकरे यांनी परवानगी देण्यासाठी केंद्रा सरकारला धन्यवाद दिले.