Coronavirus Lockdown : ‘सक्तीनं लागू करा ‘लॉकडाऊन’, बॉर्डर पूर्णपणे सीलबंद करा’, केंद्र सरकारचं राज्य शासनांना ‘फर्मान’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने राज्यांना सक्तीने लॉकडाऊनचे पालन करण्याचे आदेश दिले असून केंद्राने राज्यांना म्हटले आहे की, प्रवासी मजुरांसाठी ते जिथे आहेत तिथे सगळी व्यवस्था करा. तसेच त्यांना वेळेवर वेतन दिले जाईल. केंद्राने म्हटले कि जर एखाद्या मजुराला आणि विद्यार्थ्याला घर खाली करण्यास सांगितले तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल.

केंद्राने म्हटले कि राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद केल्या जातील जेणेकरून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात लोकं जाणार नाहीत. कोणत्याही हालचाली होऊ देऊ नयेत. रस्त्यावर फक्त सामान नेणाऱ्या गाड्यांची ये-जा करण्याची परवानगी असेल. केंद्राने म्हटले की, लॉकडाऊन लागू करणे जिल्ह्याच्या डीएम आणि एसपीची जबाबदारी आहे.

सक्तीने लॉकडाऊनचे पालन झाले पाहिजे
लॉकडाऊनचे सक्तीने पालन करण्यासाठी २९ मार्चला केंद्र सरकारकडून अनेक महत्वपूर्ण पावले उचलली गेली. केंद्राने सगळ्या राज्यांना सांगितले की, लॉकडाऊनचे सक्तीने पालन केले जाईल. सगळ्या राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या डीजीपी आणि चीफ सेक्रेटरीकडून सांगितले गेले आहे कि सध्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा नियोजित पद्धतीने सर्वसामान्यांपर्यंत पोचवावा.

जिल्हे आणि राज्य सीमा सील करा
दैनंदिन मजुरांची रस्त्यावर हालचाल पाहता, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सीमारेषा सीलबंद करण्याच्या कठोर सूचना देण्यात आल्या असून जिल्हा व राज्यांच्या सीमेवरही सील केले जाईल. स्थानिक प्रशासनाने हे सुनिश्चित केले पाहिजे की महामार्गावर केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्यांची हालचाल होईल.

प्रशासनाने करावी खाण्या-पिण्याची व्यवस्था
देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात मजूर असतील त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करावी. सोबतच प्रशासनाने हेही सुनिश्चित करावे कि त्यांच्या घरमालकाने भाडे भरण्याचा दबाव टाकू नये.

केंद्राने म्हटले की, ज्यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केले आहे आणि त्यांना सरकारकडून केल्या गेलेल्या कारवाईत १४ दिवस क्वारंटाइन फॅसिलिटीमध्ये ठेवले जाईल. याबाबत सविस्तर आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.

डीएम आणि एसपीची जबाबदारी
केंद्र सरकारकडून सगळ्या जिल्ह्यांच्या डीएम आणि एसपींना आदेश दिले गेले आहेत की, लॉकडाऊनचे सक्तीने पालन केले जाईल. तसेच कोठेही अत्यावश्यक साहित्याची कमतरता भासू नये, याकडेही लक्ष दिले जावे. कॅबिनेट सचिव आणि गृह मंत्रालय हे राज्याच्या मुख्य सचिवांशी सतत संपर्कात आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंतच्या पाहणीत लॉकडाउन बहुधा यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. आवश्यक तेथे अधिक पावले उचलली जात आहेत. दरम्यान, दिल्लीतील सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेस सेटद्वारे आदेश देण्यात आले आहेत की जर कोणताही मजूर किंवा इतर लोक रस्त्यावर दिसले तर त्यांना तिथेच थांबवावे आणि समजून घरी पाठवावे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like