Coronavirus Impact : केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठा झटका ! ‘कोरोना’मुळं ‘वार्षिक मुल्यमापन’ पुढं ढकललं, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांची अॅनुअल परफॉर्मेंश अप्रेजल रिपोर्ट्सची (APARs) प्रक्रिया सुरु करण्याची आणि पूर्ण करण्याची तारीख वाढवली आहे. कामगार मंत्रालयाच्या आदेशानुसार, कोरोना व्हायरस महामारीमुळे ही तारीख आणखी वाढण्यात आली आहे. सेंट्रल सर्विसेज ग्रुपच्या A, B आणि C अधिकाऱ्यांच्या एपीएआर (APARs) पूर्ण करण्याची नवी तारीख जारी केली आहे, केंद्र सरकारच्या सर्व दरवर्षी सर्व कर्मचाऱ्यांना एपीएआर जमा करणं अनिवार्य आहे.

आदेशात सांगण्यात आले आहे की नव्या कार्यक्रमानुसार, एपीएआर फॉर्मच्या वितरण 30 मे पर्यंत पूर्ण झाले पाहिजे, पहिल्यांदा या वितरणाची तारीख 31 मार्च होती. याच पद्धतीने रिपोर्टिंग अधिकाऱ्यांना सेल्फ – अप्रेजल जमा करण्याची तारीख 15 एप्रिल होती जी आता 30 जून करण्यात आली आहे. आदेशानुसार हा दिलासा फक्त एकाच मिळेल.

मंत्रालयाने सांगितले की रिपोर्टिंग अधिकाऱ्यांच्या एपीएआरचा खुलासा 10 सप्टेंबर (अशा स्थितीत जेथे स्वीकार करणारे अधिकारी नाहीत) पर्यंत आणि 10 ऑक्टोबर (त्या स्थितीत जेथे स्वीकार करण्यसाठी अधिकारी आहेत) पर्यंत झाला पाहिजे. पूर्ण प्रक्रिया 31 डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण झाली पाहिजे यानंतर एपीएआरमध्ये रिकॉर्डमध्ये घेतले जाईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like