‘कोरोना’ व्हायरसचा वेग कशाप्रकारे केला जावु शकतो कम ? केंद्रानं ‘या’ राज्यांना दिले 6 मंत्र, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन: ‘कोरोना व्हायरसचा मुंबई आणि दिल्लीतील रुग्णवाढीचा दर काही अंशी कमी झाला आहे. पण इतर राज्यात काही कमी होताना दिसत नाही. यामुळे केंद्र सरकारच्या चिंतेत चांगलीच भर पडताना दिसत आहे. खासकरून कर्नाटक, बिहार आणि आसाममध्ये कोरोनाने चांगलाच वेग धरला आहे. केंद्र सरकारने या राज्यातील उपाययोजनेसाठी शुक्रवारी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती.’

भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 13 लाखांच्या वर गेला आहे. मागील काही दिवसांपासून प्रतिदिन 40 हजार किंवा त्यापेक्षा जास्त या दराने रुग्ण वाढत आहेत. दुसऱ्या बाजूला मुंबई आणि दिल्लीतील रुग्णवाढीचा दर काही अंशी कमी झाला आहे, ही एक दिलासादायक बाब आहे. पण बाकीच्या उत्तरी राज्यात आणि कर्नाटकात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यात बिहार, कर्नाटक, आसाम यांचा उल्लेख विशेषतः करावा लागेल. ही संख्या कमी करण्यासाठीच केंद्राने त्या राज्यांसोबत एक बैठक आयोजित केली होती.

तीन तास चाललेल्या या बैठकीत आंध्र प्रदेश, बिहार, तेलंगना, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, झारखंड आणि उत्तर प्रदेश सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी आणि राज्यांचे मुख्य सचिव उपस्थित होते. ही ऑनलाइन कॉन्फरन्स बैठक होती. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यांचे मुख्य सचिव, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, कोविड -19 राष्ट्रीय टास्क फोर्सचे अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत सहा मुख्य मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती. ते 6 मुद्दे पुढीलप्रमाणे:

1) कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोणती पाऊले उचलली पाहिजेत हे माहीत आहेत. पण ती प्रभावीपणे कशी राबवता येतील यावर या बैठकीत चर्चा घडली.

2) ज्या 9 राज्यांत लॉकडाउन जाहीर केलेलं आहे तेथील कटेंमेंट झोन आणि सर्विलांसवर लक्ष दिलं पाहिजे. तसेच क्लीनिकल मैनेजमेंटकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे.

3) राज्यातील मेडिकल स्टाफ याकाळात खूपच व्यस्त आहे, त्यांना मदत व्हावी म्हणून रिटायर्ड डॉक्टरांना तसेच MBBS च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना मदतीला घ्यावे.

4) देशातील ज्या राज्यांची आरोग्यव्यवस्था कमजोर आहे त्यांनी योग्य नियोजन करावे. त्याचबरोबर ऑक्सीजन सिलेंडर, टेस्टिंग किट आणि औषधांची कमी पडू देऊ नये.

5) गोवा आणि दिल्लीचा बाकीच्या राज्यांनी अभ्यास करावा. तसेच कर्नाटकसारखे गाफील राहु नये नाहीतर परिणाम भोगावे लागतील.

6) राज्यातील नागरिकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात करावी. तसेच कोरोनाबद्दल माहितीही पोहचवावी.