Coronavirus : लसीकरणाच्या अगोदर आणि नंतर ‘या’ 6 गोष्टी ठेवा लक्षात, केंद्र सरकारने जारी केली गाईडलाईन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्राने राज्यांना म्हटले आहे की, त्यांनी 45+ लोकांच्या लसीकरणाला प्राथमिकता द्यावी, कारण वयस्कर लोकांना कोरोनाचा जास्त धोका आहे. तसेच केंद्र सरकारकडून लसीकरणाबाबत काही नवीन मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत. केंद्राने म्हटले आहे की, लसीकरणसंबंधात काय केले पाहिजे आणि काय नाही. सोबतच व्हॅक्सीनसाठी ऑनलाइन अपॉईंटमेट घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

ही 6 कामे करणे टाळा –
1. विना अपॉईंटमेंट लसीकरणासाठी जाऊ नका. सर्व स्लॉट्सचे नोंदणीकरण कोविनच्या माध्यमातून ऑनलाइन केले जात आहे.
2. एका व्यक्तीने एकापेक्षा जास्त प्लॅटफॉर्मवर नोंदणी करू नये.
3. एका व्यक्तीने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक फोन नंबर आणि अनेक आयडी प्रूफचा वापर करू नये.
4. लसीकरणाच्या दिवशी दारू किंवा इतर कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन करू नये.
5. व्हॅक्सीनच्या कोणत्याही साईड इफेक्टच्या प्रकरणात घाबरू नये.
6. दुसर्‍या डोससाठी कोविनवर नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

सध्या कुणी घेऊ नये लस –
* नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, जे लोक आत्ताच कोविडमधून बरे झाले आहेत त्यांनी लसीकरणासाठी आता चार आठवड्यांऐवजी तीन महिने वाट पहावी.
* तीन महिन्यापर्यंत वाट पाहण्याचा सल्ला त्या लोकांना सुद्धा आहे ज्यांच्यावर प्लाझ्मा थेरेपीने उपचार करण्यात आला आहे, आणि जे व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर संक्रमित झाले आहेत.
* ज्या लोकांना एखाद्या वेगळ्या आजरासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, त्यांनी लसीकरणासाठी चार ते आठ आडवड्यांपर्यंत प्रतिक्षा केली पाहिजे.