सरकारने जाहीर केली लसीकरण केंद्रांची यादी; ‘ही’ आहेत रुग्णालये

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, : जगासह भारतातही थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावावर आता अनेक देशांनी लस तयार केली आहे. यात भारत देखील आहे. भारतात दोन लशींना मान्यता दिली आहे. त्यामुळे त्याचे लसीकरण मोहिम सरकारने हाती घेतली आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यातील तयारीच्या दरम्यान केंद्र सरकारने रुग्णालयांची यादी जाहीर केली. हा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू होणार आहे.

कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी या प्रक्रियेत अधिक संख्येने खासगी रुग्णालयांचा समावेश केला आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत जवळपास 10 हजार खासगी रुग्णालये आणि 600 सीजीएचएस रुग्णालये केंद्र बनविली गेली आहेत. याशिवाय जर राज्य हवे असेल तर आपल्या आरोग्य योजनेनुसार इतर खासगी रुग्णालयेदेखील त्यात समाविष्ट करता येतील. शासनाने आयुष्मान भारत योजनेंतर्गत पॅनेलमध्ये समाविष्ट केलेल्या रुग्णालयांची यादीसाठी https://pmjay.gov.in/covid-vaccination-hospitals या संकेतस्थळावर क्लिक करा.

लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोणत्याही आजार असणार्‍यांना 1 मार्चपासून सरकारी केंद्रांवर एंटी-कोरोना विषाणूची लस मोफत दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना यासाठी खासगी दवाखाने आणि केंद्रांवर पैसे द्यावे लागतील.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हे सांगितलं :
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी सांगितले होते की, या वर्गातील लोकांना 10,000 शासकीय केंद्रांवर मोफत लस दिली जाईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले की, जे 20 हजार खासगी दवाखाने किंवा केंद्रांवर लसी देतात त्यांना फी भरावी लागेल. भारत सरकार शासकीय केंद्रांवर मोफत लस तयार करण्यासाठी आवश्यक पूरक वस्तू खरेदी करेल व त्या राज्यांना उपलब्ध करुन देईल.

येथे लस निवडण्याचा पर्याय नाही :
लोकांना कोव्हीडशिल्ड किंवा कोवाक्सिनमधून लस निवडण्याचा पर्याय आहे का?, असे विचारले असता केंद्रीय मंत्री म्हणाले, भारताने दोन लशींना मान्यता दिली असून दोन्ही लस प्रभावी आहेत. त्यांची संभाव्यता सिद्ध झाली आहे. मोठं कोव्हीड लसीकरण लसीकरण मोहीम 1 16 जानेवारीपासून सुरू झाली आहे. तर, आतापर्यंत 1,07,67000 लोकांना लसी देण्यात आली असून 14. लाख लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशाप्रकारे लसीकरण मोहिम सरकारने केली असून पुढील लसीकरणासाठी योग्य ते नियोजन केलेले आहे.