दुचाकी चालकांसाठी मोठी बातमी ! बदलणार दुचाकीवर बसण्याची पद्धत, सरकारचा नवीन आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   केंद्र सरकारने रस्ते सुरक्षेसाठी बर्‍याच नियमांमध्ये बदल केले आहेत, त्याचवेळी काही नियम बनवले आहेत. अलीकडेच मंत्रालयाने दुचाकी चालवणाऱ्या लोकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे आणली आहेत. जाणून घेऊया या मार्गदर्शक सूचनांविषयी ..

– मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार, दुचाकीच्या दोन्ही बाजूस ड्रायव्हरच्या सीटच्या मागे हॅन्ड होल्ड असतील. मागे बसलेल्या लोकांना संरक्षण देणे हा त्याचा हेतू आहे. आतापर्यंत बहुतांश बाईकमध्ये ही सुविधा नव्हती. यासह दुचाकीच्या मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूंनी फूटबोर्ड बंधनकारक केले आहे.

– याशिवाय दुचाकीच्या मागील चाकाच्या डाव्या बाजूच्या निम्म्या बाजूस अर्ध्या भाग सुरक्षितपणे कव्हर केले जातील, जेणेकरून मागील सीटवर बसणाऱ्याचे कपडे मागील चाकामध्ये अडकणार नाहीत.

– या बरोबरच मंत्रालयाने दुचाकीमध्ये हलके कंटेनर लावण्यासाठीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिली आणि उंची 500 मिमीपेक्षा जास्त नसावी.

– गाडीच्या मागील सीटवर कंटेनर ठेवल्यास केवळ ड्रायव्हरलाच मान्यता देण्यात येईल. म्हणजेच दुसर्‍या कोणत्याही व्यक्तीला त्या दुचाकीवर बसता येणार नाही. सरकार वेळोवेळी या नियमांमध्ये बदल करेल.

– नुकतीच सरकारने टायरसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे. त्याअंतर्गत जास्तीत जास्त 3.5 टन वजनाच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सुचविण्यात आली आहे.

– या यंत्रणेतील सेन्सरच्या माध्यमातून वाहन चालकाला वाहनाच्या टायरमध्ये हवेच्या स्थितीची माहिती मिळते. यासह मंत्रालयाने टायर रिपेयरिंग किट्सचीही शिफारस केली आहे. हे लागू झाल्यानंतर, वाहनास अतिरिक्त टायर लागणार नाहीत.