मोदी सरकारकडून ‘व्हेईकल पुलिंग पॉलिसी’ लवकरच, ‘प्रदुषण’ आणि ‘कोंडीतून’ सुटका होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ट्राफिक समस्येवर उपाय म्हणून आता केंद्र सरकारने एक नवीन उपाययोजना आणली आहे. यासाठी केंद्र सरकार लवकरच सर्व राज्यांना एक नियमावली जाहीर करणार आहे. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार सर्व राज्यांना व्हेईकल पुलिंग सर्व्हिस साठी प्रोत्साहन देणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय कर्नाटक सरकारच्या राज्यातील ओला आणि उबेरच्या गाड्यांवर पुलिंग करण्यासाठी घातलेल्या बंदीनंतर घेतला आहे. कर्नाटक सरकारने राज्यात ओला आणि उबेर या दोन खासगी कंपन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिक शेअर रिक्षा किंवा कॅब शेअर करून प्रवास करतील.

व्हेईकल पुलिंगच्या समर्थनार्थ केंद्र सरकार

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय या पद्धतीवर विचार करत असून लवकरच हि पद्धत अंमलात आणण्याचा सरकारचा विचार आहे. मागील आठवड्यात कर्नाटक सरकारने राज्यातील ओला आणि उबेर यांना पुलिंग पद्धत बंद करण्यास सांगितले. राज्य सरकारने हे आदेश देताना म्हटले कि, यामुळे इतर टॅक्सी चालकांच्या कमाईवर त्याचा थेट परिणाम होतो. त्याचबरोबर एका अधिकाऱ्याने सांगितले कि, केंद्र सरकार याचे समर्थन करत आहे कारण यामुळे रस्त्यांवर ट्राफिक देखील कमी होईल आणि यामुळे पर्यावरणाला देखील याचा फायदा होणार आहे.

खासगी वाहनांना वाहतुकीची परवानगी

केंद्र सरकारकडून नवीन ट्रान्सपोर्ट पॉलिसी लागू झाल्यानंतर खासगी वाहनांना देखील याचा फायदा होणार आहे. यामुळे खासगी वाहनांना देखील वाहतुकीची परवानगी मिळणार असून नागरिक आपल्या खासगी गाडीचा वापर देखील टॅक्सीप्रमाणे करू शकतात. एकाअधिकाऱ्याने माहिती दिली कि सर्व जण याच्या समर्थनात असून लवकरच हि पॉलिसी लागू होईल.

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील