श्रीवास्तव यांची पुण्याला बदली, विद्याधर पवार भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नवीन ‘CEO’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. श्रीवास्तव यांची पुणे येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी गोव्याहून विद्याधर वासुदेव पवार हे नव्याने बदलून येणार आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीवास्तव हे जून २०१७ मध्ये नगरला बदलून आले होते. दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण होताच त्यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नव्याने बदलून येत असलेले विद्याधर पवार हे गोवा येथे डिफेन्स इस्टेट ऑफिसर होते. ते मूळचे मंगळवेढा (सोलापूर) येथील असून, २०१० च्या बॅचचे अधिकारी आहेत. गोव्यापूर्वी त्यांनी विशाखापट्टणम येथे डिफेन्स इस्टेट ऑफिसर म्हणून काम पाहिलेले आहे.

आरोग्यविषयक वृत्त